vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गुड न्यूज! आता महाराष्ट्र शासनाचे थेट अपडेट्स मिळणार ‘व्हॉट्सॲप’ चॅनल आणि ‘पब्लिक ॲप’ वर!

गुड न्यूज! आता महाराष्ट्र शासनाचे थेट अपडेट्स मिळणार ‘व्हॉट्सॲप’ चॅनल आणि ‘पब्लिक ॲप’ वर!

       मुंबई, प्रतिनिधी.: समाजमाध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्म्सद्वारे नागरिकांपर्यंत अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आता ‘व्हॉट्सॲप’ चॅनल आणि ‘पब्लिक’ ॲप वर अधिकृत, प्रमाणित खाती सुरू केली आहेत.आता नागरिक ‘व्हॉट्सॲप’ चॅनलवर DGIPR, Govt of Maharashtra या नावाने, तर पब्लिक ॲपवर महाराष्ट्र शासन (@mahadgipr) या नावाने शासकीय घडामोडींचे थेट अपडेट्स मिळवू शकतील. या दोन्ही प्लॅटफॉर्म्समुळे जनतेपर्यंत अधिक गतीने, अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती थेट आणि व्यापक स्वरूपात पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.

शासन आणि जनतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासनाचे विविध लोकोपयोगी उपक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचविणे आणि त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालय पार पाडत असते. हे काम करताना डिजिटल क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणून महासंचालनालयाने हायपरलोकल कंटेंट देणाऱ्या ‘पब्लिक ॲप’ वर आणि ‘व्हॉट्सॲप चॅनल’ वर आपली उपस्थिती नोंदवली आहे.

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत अपडेट्स हवे आहेत? मग खालील लिंक्सवर क्लिक करून आजच अफवांवर विश्वास ठेवू नका! शासनाच्या अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी वरील चॅनेल्सना नक्की फॉलो करा

000000

 

संबंधित पोस्ट

दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानांची दीक्षाभूमीला भेट

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज कपूर पुरस्कारांचे वितरण राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व उत्साहात संपन्न

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी: माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक ..

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी कुंभच्या यशस्वी आयोजनासाठी निधी कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· साधू, महंत यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन· आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरूनोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा महात्मा ज्योतिबा फुले यांची 135 वी पुण्यतिथी…

vishwatmaklokswamivarta

ह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके