vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सेवा संकल्प अभियाना’ला मोठे यश: अवघ्या एका महिन्यात तब्बल १००७ सनदांचे वाटप; ₹८.५६ लाखांहून अधिक महसूल जमा

सेवा संकल्प अभियाना’ला मोठे यश: अवघ्या एका महिन्यात तब्बल १००७ सनदांचे वाटप; ₹८.५६ लाखांहून अधिक महसूल जमा

रत्नागिरी,  प्रतिनिधी: जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या अधिनस्त असलेल्या विविध उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना‘ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या एका महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील ३९ गावांमध्ये एकूण १,००७ सनदांचे यशस्वी वाटप करण्यात आले असून, त्याद्वारे शासनाच्या तिजोरीत ८,५६,५१३ रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. या अभियानांतर्गत प्रलंबित सनदांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना मालमत्तेचे हक्क अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आलेतालुकानिहाय कामगिरीचा आढावा:

  खेड तालुका अव्वल: खेड तालुक्याने या अभियानात आघाडी घेतली असून सर्वाधिक १४ गावांमधील ४३१ नागरिकांना सनदांचे वाटप करण्यात आले. यातून ३,६०,९७७ रुपये इतके सनद शुल्क जमा झाले आहे.  मंडणगड तालुक्याची दमदार कामगिरी: मंडणगड उपअधीक्षक कार्यालयाने १३ गावांमधील २५३ सनदांचे वाटप करून १,९४,०५० रुपयांचे शुल्क संकलित केले.  दापोली तालुका: दापोलीतील ५ गावांमधील १२८ लाभार्थ्यांना सनद सुपूर्द करण्यात आल्या असून १,१०,९३० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. चिपळूण तालुका: चिपळूणमध्ये १ गावातील ९१ सनदांचे वितरण पूर्ण झाले असून ९९,८८५ रुपये शुल्क जमा झाले.रत्नागिरी तालुका: रत्नागिरी उपअधीक्षक कार्यालयाकडून २ गावांमधील ५४ सनदांचे वाटप करण्यात आले व ५३,४६५ रुपयांची वसुली झाली  गुहागर तालुका: गुहागर तालुक्यातील ४ गावांमधील ५० नागरिकांना सनदा वितरित करण्यात आल्या असून ३७,२०६ रुपये शुल्क प्राप्त झाले.,भूमी अभिलेख विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन नागरिकांचे प्रश्न जलदगतीने निकाली काढल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या नियोजनबद्ध व तत्पर कार्यपद्धतीमुळे हजारो मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

००००

संबंधित पोस्ट

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) व (3) लागू

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

श्री क्षेत्र धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन; सुमारे ५० हजार भाविक येण्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

पुढील ५० वर्षांचा विचार करून पुण्याच्या वाहतुकीचे नियोजन करूया- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ▪️मेट्रो, बससेवा, रिंग रोड, मिसिंग लिंक, पूल व रस्ते प्रकल्पांचा एकात्मिक विकास करण्यावर भर▪️वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमणे व डबल पार्किंगच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक वाहतूक समित्या स्थापन होणार▪️सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याला प्राधान्य▪️वाहतूक व्यवस्थेतील समस्या व उपाययोजनांबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांचे सादरीकरण…

महामार्गावरील  अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत,महामार्ग सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून पंधरवड्याला अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना विशेष लेख केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन: शाश्वत आणि रसायनमुक्त शेतीकडे खंबीर पाऊल…