vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पत्रकार दिनः जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादनचौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे योगदान अमूल्य- प्रशांत दैठणकर

पत्रकार दिनः जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादनचौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे योगदान अमूल्य- प्रशांत दैठणकर

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आपल्या देशाच्या लोकशाहीच्या अन्य तीन स्तंभांवर प्रहरी म्हणून लक्ष ठेवून माध्यमांनी लोकशाही बळकट करण्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे, असे प्रतिपादन प्रभारी उपसंचालक प्रशांत दैठणकर यांनी आज येथे केले.

जिल्हा माहिती कार्यालयात समिती सभागृहात पत्रकार दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रभारी उपसंचालक प्रशांत दैठणकर यांच्या हस्ते आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.

जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, ज्येष्ठ पत्रकार डॉ.रामभाऊ अग्रवाल, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी सतिष औरंगाबादकर, किशोर महाजन, अब्दुल गनी शेख, राजू वाघमारे, रतन साळवे, रामनारायण जोशी, सईद शेख, वाय.के. नारायणपूरकर, सुरेश क्षीरसागर, नदीम सौदागर, विजय अवसरमल, कल्याण अन्नपूर्णे, सतिष जाधव, सुरेश साळवे, डॉ. शेख अफसर, राजेश सोनवणे, जकी नवाब पटेल, सुजित ताजने, आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

याप्रसंगी सर्व उपस्थित पत्रकारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी आपलेमनोगत व्यक्त केले. राजू वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल परदेशी, स्वाती शार्दूल, मंजूश्री मुळे, सतिष वाबळे, सागर दांडगे, मोहसिन मन्सूरी, चंद्रकला दाभाडे, संजय दीक्षित आदींनी परिश्रम घेतले.

०००००

संबंधित पोस्ट

नागरी सुविधापूर्तीप्रमाणेच नागरिक सुरक्षेलाही महत्व देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित;१५ दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांसाठी कारागृहात रक्षाबंधन

vishwatmaklokswamivarta

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर तीथक्षेत्र विकासासाठी 4150.46 कोटीच्या विकास आराखड्यास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता

नव्या मुंबईतील कोपरखैरणे येथील इमारतीचा स्लॅब कोसळला – समाजमंदिरात रहिवाशांची निवास व्यवस्था