vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे. चांगल्या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना भक्कम पाठींबा देण्णारी आहे. यापूढेही माध्यमांच्या प्रतिनिधींनी लोकहिताची कामे करताना सहकार्य करावे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि माध्यमे यांनी साताऱ्याच्या उज्वल विकासासाठी हातात हात घालून एकत्र काम करुया, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्यावतीने पत्रकारांसाठी, सर्व माध्यमांतील प्रतिनिधींसाठी चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार नितीन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह संपादक, वरिष्ठ पत्रकार, इलेक्ट्रानिक मिडीयाचे प्रतिनिधी, समाज माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताऱ्याला निर्भिड पत्रकारीतेचा वारसा असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या आधीच्या पिढीतील अनेक दिग्गज पत्रकारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकारीता केली. लोकहितकारी उपक्रमांना भरु भरुन पाठींबा देत असतानाच जिथे चुका व त्रूटी आढळलेल्या त्यावर कठोरपणे प्रहार करुन डोळ्यात अंजन घालण्याचे कामही त्यांनी केले. समाजातील अनिष्ठ प्रथा, समस्या यावर प्रकाश टाकून लोकांना जागरुक करण्याचे काम पत्रकारितेने केल्याचे सांगून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटीबध्द राहू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. नुकतेच झालेले 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संयोजक, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रशासकीय यंत्रणा यांचे त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले.

खासदार नितीन पाटील यांनी यावेळी पत्रकार, माध्यम प्रतिनिधींना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील म्हणाले, जे चांगले त्याला प्रसिध्दी देण्याचे आणि जिथे त्रूटी आढळल्या त्या निर्दशनास आणून देण्याचे कार्य साताऱ्यातील वृत्तपत्रे व मिडीया अव्याहतपणे करत आले आहेत. साताऱ्यातील वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी सकारात्मक पत्रकारितेचे व लोकहितासाठी अखंडपणे लढण्याचे व्रत कायमपणे जोपासले आहे. सरकार आणि जनता यांच्यामधील दुवा जपत असतानाच जनतेला माहिती देणे आणि कोणतीही माहिती सत्य व वस्तूनिष्ठ स्वरुपात मांडणे असा येथील पत्रकारितेचा अनुभव आपण घेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी 32 वर्षांनंतर साताऱ्यात झालेले 99 वे अखिल भारतीय संमेलन यशस्वी करण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण राहीली आहे. कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी हे वरिष्ठ पत्रकार असून हे साहित्य संमेलन साताऱ्यात आणण्यात आणि चार दिवसांचे साहित्य संमेलन अनेक नवीन मापदंडांसह निर्माण करत यशस्वी करण्यात त्यांच्या बजावलेल्या भूमिकेचा अभिमान असल्याबाबत गौरवपूर्ण उद्गार काढले.

यावेळी विनोद कुलकर्णी यांचा पालकमंत्री यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विनोद कुलकर्णी यांनी प्रशासनाने या साहित्य संमेलनाला यशस्वी करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याबद्दल प्रशासनाचे व सर्वच घटकांचे आभार व्यक्त केले.

0000

संबंधित पोस्ट

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक, उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला दिल्या तातडीने सूचना

महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण..

जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ही-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी, चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या- थेट कर्ज योजनेसाठी 30 मार्च रोजी लॉटरीने निवड