vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट ..

अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट ..

 

नांदेड, प्रतिनिधी- जानेवारी : नांदेड तहसील प्रशासन व नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मंडळ अधिकारी सय्यद मोहसीन, ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी, मनोज सरपे, मनोज जाधव, माधव भिसे, मारुती श्रीराम, महसूल सेवक बालाजी सोनटक्के व शिवा तेलंग यांच्या महसूल पथकाने पिंपळगाव निमजी परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या एक मोठी बोट, एक छोटी बोट व १२ तराफे आढळून आले. संबंधित बोटी नदीच्या मध्यभागी ठेवण्यात आल्या होत्या.

सदर बोटी जप्त करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, मनोज जाधव व शिवा तेलंग यांनी धाडसाने नदीत पोहत जाऊन बोटी ताब्यात घेतल्या. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या बोटी व तराफ्यांचा एकूण अंदाजे २७ लाख रुपयांचा मुद्देमाल पूर्णपणे जाळून व फोडून नष्ट करण्यात आला.

या कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओंकान्त चिंचोलकर यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला.

अवैध वाळू उत्खननाच्या प्रकरणांमध्ये महसूल प्रशासनाकडून यापुढेही सक्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.

००००

संबंधित पोस्ट

समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याणकरण्याची राज्य शासनाची भूमिका- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे- मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात – 21 स्टॉलमधून शासनाच्या योजनांची माहिती प्रदर्शित विविध शासकीय योजनांचा 3 हजार 800 हून अधिक लाभार्थींना लाभ वाटप

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत..

vishwatmaklokswamivarta

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची जालना महानगरातील योगेश नगर व महादेव मंदिर परिसराला भेट

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव

vishwatmaklokswamivarta