vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन आयुष्मान कार्ड मंजूर होण्यापर्यंतचा बहुमूल्य वेळ वाचविता यावा यासाठी नागरिकांनी आयुष्मान कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आलेआहे

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन आयुष्मान कार्ड मंजूर होण्यापर्यंतचा बहुमूल्य वेळ वाचविता यावा यासाठी नागरिकांनी आयुष्मान कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आलेआहे

आरोग्य प्रतिनिधी

‘एकत्रित #आयुष्मानभारत – प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य’ योजनेचे कामकाज राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या ‘टीएमएस २.०’ या प्रगत संगणक प्रणालीवर आल्यामुळे आरोग्य सेवेला वेग, पारदर्शकता व उपचारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ही प्रणाली रुग्णाच्या बायोमॅट्रीक उपस्थितीची नोंद घेणे, कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित गैरप्रकार रोखणारी यंत्रणा, तसेच संपूर्ण ऑनलाईन पारदर्शक आधुनिक संगणकीय प्रणाली आहे. तसेच ही प्रणाली लागू झाल्यापासून उपचारांच्या संख्येत १३५६ वरुन २३९९ पर्यंत वाढही झालेली आहे.

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन आयुष्मान कार्ड मंजूर होण्यापर्यंतचा बहुमूल्य वेळ वाचविता यावा यासाठी नागरिकांनी आयुष्मान कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आलेआहे

. आयुष्मान कार्ड तयार करण्याची कार्यपद्धती अत्यंत सोपी असून लाभार्थी आयुष्मान अॅपद्वारे किंवा https://beneficiary.nha.gov.in/ या संकेतस्थळावरून स्वतःचे कार्ड स्वतः तयार करू शकतात किंवा कोणत्याही आशा सेविका, रेशन दुकानदार आणि आपले सरकार सेवा केंद्र येथूनही आपले कार्ड तयार करून घेऊ शकतात.

पुढील तीन दिवसापर्यंत ई-केवायसीसह रुग्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन घेण्याची मुभा रूग्णालयांना देण्यात आली आहे. या कालावधीत रुग्णास उपचार नाकारले जाणे किंवा पैशांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी आल्यास संबंधित आरोग्यमित्र, योजनेचे जिल्हा समन्वयक आणि प्रादेशिक व्यवस्थापक यांनी रुग्णास तात्काळ मदत करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याबरोबरच निःशुल्क उपचार त्वरित सुरू करून घेण्यासाठी सहाय्य करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

यासाठी प्रत्येक रुग्णालयात नियुक्त आरोग्यमित्र आणि योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक व जिल्हा समन्वयक यांचे दूरध्वनी क्रमांक रुग्णालयातील योजनेच्या कक्षात प्रदर्शित करण्यात आले असून त्यांना संपर्क साधून मदत घेता येईल. तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या support@jeevandayee.gov.in या ईमेलवर किंवा टोल फ्री क्रमांक १५५३८८/१८००२३३२२००, १४५५५/१८००१११५६५ यावर संपर्क साधता येईल.”

 

#जनआरोग्य

संबंधित पोस्ट

अगदी अल्प प्रमाणातील मद्यपानानेही मुखाचा कर्करोग होण्‍याचा धोका -अभ्‍यासातून धोक्याची सूचना ‘टाटा मेमोरियल सेंटर’च्या नवीन विस्तृत अभ्यासातून निष्‍कर्ष

vishwatmaklokswamivarta

सामाजिक सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

शिराळ्यात 14 ते 16 फेब्रुवारीदरम्यान मोफत आरोग्य शिबीर

vishwatmaklokswamivarta

मोफत वैद्यकीय उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी,आयुष्मान कार्ड आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा