vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

आधुनिक तंत्रज्ञानात मराठीचा वापर वाढवा – कवी डॉ. हबीब भंडारे

आधुनिक तंत्रज्ञानात मराठीचा वापर वाढवा – कवी डॉ. हबीब भंडारे

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : मराठी ही आपल्या विचारांचा, भावनांचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा आधार आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आपली जबाबदारी अधिक वाढली असून दैनंदिन व्यवहार, शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानात मराठीचा अधिकाधिक वापर करावा, असे प्रतिपादन कवी डॉ. हबीब भंडारे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय व भाषा संचालनालय, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ‘मराठी भाषा सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात डॉ. भंडारे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सविता चौधर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रुपेश शिंगारे, विभागीय संचालक बाबासाहेब जगताप यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. भंडारे म्हणाले की, ताम्रपट, शिलालेख आणि ‘गाथासप्तशती’पासून मराठी भाषेची प्राचीन व समृद्ध परंपरा दिसून येते. यादव काळात मराठीचा राज्यव्यवहारात वापर झाला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही मराठीला राज्यकारभारात महत्त्वाचे स्थान मिळाले. संत साहित्याने मराठीचा सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा अधिक समृद्ध केला.

मातृभाषा ही भावनिक आणि वैचारिक विकासाचे प्रभावी माध्यम आहे. उच्च व तांत्रिक शिक्षणातही मराठीचा वापर वाढला पाहिजे. मराठीतील दर्जेदार साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादित व्हावे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि विविध डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा वापर वाढवावा. स्वतःची स्वाक्षरी मराठीत करण्यापासूनही याची सुरुवात करता येईल, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात विभागीय संचालक बाबासाहेब जगताप यांनी सांगितले की, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मराठीच्या हजारो वर्षांच्या साहित्यिक, सांस्कृतिक व भाषिक परंपरेचा गौरव आहे. यासाठी रंगनाथ पठारे, हरी नरके यांच्यासह अनेक संशोधक व साहित्यिकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अभिजात दर्जानंतर मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि व्यवहारातील वापर वाढविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

संबंधित पोस्ट

डिजिटल अरेस्ट आणि पेन्शन फसवणुकीविरुद्ध वासिंद पोलिसांचे कवच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जनजागृती उपक्रम

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

पॅनल पध्दतीने प्रथमत:च मतदान होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती

vishwatmaklokswamivarta

एनसीएमसी कार्डधारकांसाठी आता भीम ॲपद्वारे सहज टॉप अप करता येणार

vishwatmaklokswamivarta

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम!

vishwatmaklokswamivarta

‘आयुष’ची बहुभाषिक डिजिटल सेवा बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभाग यांच्यात सामंजस्य करार