vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मातंग समाजाला राजकीय वाटा मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*मातंग समाजाला राजकीय वाटा मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई कोल्हापूर प्रतिनिधी – मातंग समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सदैव प्रयत्नशिल आहे.बौध्द आणि मातंग समाज हे भाऊ-भाऊ म्हणुन महाराष्ट्रात एकत्र आहेत.अनुसुचित जातीतील 59 जातीं पैकी महाराष्ट्रात बौध्द आणि मातंग प्रमुख समाज आहेत.अनुसुचित 59 जातींना एकत्र आणुन त्या सोबत ओबीसी,मराठा,मुस्लिम आणि सर्व अप्लसंख्यांक समाजाचे रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेड्यांखाली ऐक्य उभारणे हे आपले उदिष्ट आहे. सर्व समाजला एकत्र करुन रिपब्लिकन पक्ष सत्तेचा वाटा मिळवू शकतो.मातंग समाजाला आगामी स्थानीक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष उमेदवारी देईल.महायुतीच्या माध्यामातुन महामंडळामध्ये ;शासकीय समितींमध्ये मातंग समाजाला स्थान देऊन आगामी काळात मातंग समाजाला सत्तेचा वाटा मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले

कोल्हापुर येथील दसरा चौकात रिपब्लिकन पक्ष मातंग आघाडीच्या वतीने राज्यव्यापी मातंग समाज न्याय हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती.हि परिषद मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली .या परिषदेला हजारो मातंग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापुर जिल्हाअध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्या पुढाकारातुन कोल्हापुरात मातंग समाज न्याय हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती.या परिषदेत प्रमुख मार्गदर्शन म्हणुन ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; अशोक गायकवाड , प्रा.शहाजी कांबळे ,परशुराम वाडेकर ; मंगलराव माळगे संजय लोखंडे ; नंदकुमार साठे आदी अनेक मान्यावर उपस्थित होते.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष देशात प्रबळ पक्ष करण्याचा माझा प्रयत्न आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी बौध्द मातंग समाजाच्या एकजुटी सोबत दलितामधिल सर्व जाती; आदिवासी आणि ओबीसी,मराठा सर्व जाती धर्मांना रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेड्यांखाली एकत्र आणावे लागेल मातंग समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निळा झेंडा हाती घेऊन गावागावातील सर्व जाती धर्मींयांना रिपब्लिकन पक्षात जोडले पाहिजे.दलित,आदिवासी,ओबीसी,बहुजन,

संबंधित पोस्ट

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत विजेत्या गणेशोत्सव मंडळाची नावे जाहीर विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळ राज्यात प्रथम

vishwatmaklokswamivarta

कन्नड शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव सादर करावा– मंत्री गुलाबराव पाटील

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहितीआपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना…

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती विभागाने राज्यस्तरावर नावलौकिक मिळवावा – पालकमंत्री संजय राठोड पालकमंत्र्याच्या हस्ते विभागीय महसूल महोत्सवाचे उद्घाटन

जम्मू-काश्मिरहून परतलेल्या पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साधला संवाद

महिला व बालकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे

vishwatmaklokswamivarta