vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक ! वसई होली फॅमिली शाळेत येशू चमत्कारांचे नाट्य!-अंधश्रद्धा पसरवून धर्मांतर षड्यंत्र – जादूटोणा कायद्याने गुन्हा नोंदवा– हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक ! वसई होली फॅमिली शाळेत येशू चमत्कारांचे नाट्य!-अंधश्रद्धा पसरवून धर्मांतर षड्यंत्र – जादूटोणा कायद्याने गुन्हा नोंदवा– हिंदु जनजागृती समितीची मागणी

राज्य प्रतिनिधी-  पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व येथील होली फॅमिली कॉन्व्हेंट हाईस्कूलच्या ३१ डिसेंबर २०२५ च्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी येशूच्या स्पर्शाने आंधळा बरा होणे, लंगडा चालणे आदी असाध्य आजार बरे करणारे चमत्कारांचे नाट्यमय प्रदर्शन केले. याविषयीचा सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. तसेच https://youtu.be/0Qp2Q7Yv7ik या व्हिडिओवरून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते. हिंदु जनजागृती समितीने यावर तात्काळ कारवाईसाठी वसई-विरार पोलीस उपायुक्त, माणिकपूर पीआय व परिमंडळ-२ उपायुक्त यांना प्रत्यक्ष निवेदन दिले आहे.
    या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे. या वेळी निवेदन देतांना समितीचे सर्वश्री विलास निकम, प्रशांत पाटील, अतुल मेहता, संदीप तुळसकर आणि जामकर हे उपस्थित होते.
    या तक्रारीत म्हटले आहे की, हे अवैज्ञानिक प्रदर्शन महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या कलम ३ अंतर्गत दंडनीय आहे, ज्यात तथाकथित चमत्कारांचा प्रचार समाविष्ट आहे. शाळेत अंधश्रद्धा पसरवून मुलांच्या कोवळ्या मनावर अवैज्ञानिक धारणा बिंबवल्या जातात, ज्यामुळे मानसिक विकास बाधित होतो व शैक्षणिक परिसरात खोटे चमत्कारांच्या माध्यमातून प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून येशूविषयी विद्यार्थ्यांमध्ये खोटी प्रतिमा निर्माण करून विद्यार्थ्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे षड्यंत्र उघडपणे दिसत आहे.
    समितीने शाळा प्रशासनाची चौकशी, शिक्षण आणि मुख्याध्यापकांचे निलंबन, गुन्हा नोंद व सर्व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी केली आहे. श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘हिंदू मुलांच्या कोवळ्या मनावर खोटे चमत्कार बिंबवून धर्मांतराचे विघटनकारी षड्यंत्र चालवले जाते! शिक्षण हे विवेक जागृत करणारे असावे, चमत्कार, अंधश्रद्धेचे नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.’’श्री. सुनील घनवट राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड,हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : ७०२०३८३२६४)

—————————————————————-

संबंधित पोस्ट

संभाव्य पाणीटंचाईचे गावनिहाय कृती आराखडे २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत- मंत्री गुलाबराव पाटील· जलजीवन मिशनअंतर्गत ७५ ते ९९ टक्के पूर्ण झालेल्या योजना प्राधान्याने कार्यान्वित करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुष्पहार अर्पण

जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध**अद्याप नोंदणी नसलेल्या पात्र मतदारांनी नोंदणी करावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई, महाराष्ट्र लोकभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.    

vishwatmaklokswamivarta

वरळी येथील दूरदर्शन केंद्रात प्लॅनेट रीड ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला

vishwatmaklokswamivarta