vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वीप उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हस्तकला, रांगोळी प्रदर्शनातून दिला मतदानाचा संदेश…

स्वीप उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हस्तकला, रांगोळी प्रदर्शनातून दिला मतदानाचा संदेश…

 

        नवी मुंबई प्रतिनिधी ‘ नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता नागरिकांमध्ये मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक प्रमाणात मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अंतभाव करण्यात आलेला आहे.

   स्वीप कार्यक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध प्रकारचे मतदान जागृती उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुणांना उत्तेजन मिळावे व त्या माध्यमातून निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश प्रसारित व्हावा अशाप्रकारे अभिनव उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.

     कोपरखैरणे से.7 येथील नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा क्र.31 नेहमीच वेगळया प्रकारचे कार्यक्रम कल्पकतेने आयोजित करीत असल्यामुळे सांस्कृतिक उपक्रमांची जपणूक करणारी शाळा म्हणून ओळखली जाते. 15 जानेवारी 2026 रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद यांनी हस्तकला व रांगोळी कलेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

     या हस्तकला प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत वेगवेगळया प्रकारच्या वस्तू निर्माण केल्या तसेच कागदी पिशव्या, पतंग अशा टाकाउुपासून टिकाउु वस्तूंवर व त्याठिकाणी काढलेलया आकर्षक रांगोळीवर मतदानाचे आवाहन करणारे संदेश चितारुन मतदानाविषयी जनजागृतीही केली. शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे व निवडणूक विषयक स्वीप कार्यक्रमाचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे यांनी पुढाकार घेत शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांसह हा उपक्रम यशस्वी केला.

       विशेष म्हणजे यावेळी 9-10 चे 230 विद्यार्थी आणि इयत्ता 8 वीचे 110 विद्यार्थी यांनी शाळेच्या परिसरात मतदान जागृती विषयी रॅली काढून 100 टक्के मतदानाचे आवाहन केले. ‘मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो’, ‘प्रत्येक मतदार – लोकशाहीचा आधार’, ‘जबाबदारीने करा मतदान – राखा संविधानाचा सन्मान’ अशा विविध घोषणा देत व घोषणांचे फलक उंचावत काढलेल्या मतदान जागृती रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी मार्केट क्षेत्रात जाऊन तेथील दुकानदार व ग्राहक तसेच रस्त्यावरील नागरिक यांच्यामध्येही मतदान विषयक जागृती करण्यात आली.

000

संबंधित पोस्ट

सातारा जिल्ह्यातील साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी..

vishwatmaklokswamivarta

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत आवाहन

भारतीय रेल्वेने तीन विभागांमध्ये 472 किमी मार्गावर ‘कवच 4.0’ सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून अंमलबजावणीला दिली गती एकाच दिवसात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कार्यान्वयन साध्य

vishwatmaklokswamivarta

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश