vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष-जिल्ह्यातील शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष-जिल्ह्यातील शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त त्यांचे कार्य व इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शाळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात विविध शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 यासंदर्भात शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४४५९ शाळा आहेत. त्यातील ३९४३ शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व स्पर्धा परीक्षा घेऊन जनजागृती करण्यात आली. २५९७ शाळांमध्ये समुह गीत गायनाचे आयोजन करण्यात आले. २९३० शाळांनी प्रभात फेरी काढून गावात जनजागृती केली. ४१२५ शाळांमध्ये माहितीपट व भक्तीगीताचे व्हिडीओद्वारे प्रदर्शन करण्यात आले. आयोजीत केलेल्या विविध स्पर्धांमधून १३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नवगाव येथे प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच गुरुतेग बहादुर यांच्या जीवनावर आधारित हिंद दी चादर या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. पिंपळगाव गंगदेव ता. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत मध्ये श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्षा निमित्त विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तिडका ता. सोयगाव येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरी ता. गंगापूर प्रभात फेरी काढून त्यांच्या जीवनावर आधारित गीत विद्यार्थ्यांना ऐकवले. तर टोणगाव येथे गुरूतेग बहाद्दूर प्रभातफेरी व चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामिण व शहरी भागातील विविध शाळांमध्ये हे उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.

०००००

संबंधित पोस्ट

सहकार पुरस्कार 2023-24 करिता सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबईत १० कोटींचा गांजा जप्त – गुजरातमधील टोळीचा पर्दाफाश, दोन आरोपींना अटक: चुनाभट्टी पोलिस….

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर ६ ते ९ जूनदरम्यान पसंतीक्रम नोंदविण्याची संधी; १३ जूनला प्रवेश वाटप यादी प्रसिद्ध होणार

आंदोलन कोण करायचे हेही सरकार ठरवणार का?राजेंद्र दातेपाटील यांच्या ताब्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांच्याकडून निषेधमराठा आरक्षणाच्या मागणीवरून छत्रपती संभाजीनगरात वातावरण तापलेपोलिसांनी नोटीस बजावत आंदोलनाची परवानगी नाकारत बळजबरीने ताब्यात घेतले_

व्यवसायातील समस्या व कराच्या बोजावर गंभीर चर्चामराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या संचालक मंडळाची बैठक

सार्वजनिक वितरण व्यवस्थतेतील धान्याच्या काळाबाजारा,विरोधात मोठी संयूक्त कारवाई 250 क्विंटल धान्य जप्त