vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विविध कंत्राटी पदांसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विविध कंत्राटी पदांसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर यांच्या आधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी तत्त्वावर विविध पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वि. ल. कोरडे यांनी केले आहे.

वसतिगृहामध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात वसतिगृह अधीक्षक, सहायक वसतिगृह अधीक्षक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी व सफाई कामगार ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात. मात्र, माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार निर्व्यसनी असणे आवश्यक आहे. वसतिगृह अधीक्षक व चौकीदार यांचा कामाचा कालावधी २४ तासांचा राहील.

अर्जासोबत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळविण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक व नागरी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

दीड दिवसांचा गणपती — येणे आणि जाणे कमी कालावधी, पण पूर्ण अनुभव — हा मोठा धडा माझा गणेशोत्सव : परंपरेच्या मागचा अर्थ शोधताना… विजयकुमार कट्टी

vishwatmaklokswamivarta

पाण्याची आवर्तने देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे- नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर चार मजूर जखमी झाले. सदर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू

आमदार धिरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 10 लक्ष रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटपजिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करु : आ. धिरज लिंगाडे