vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांवर भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थैर्याचे आवाहन- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांवर भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थैर्याचे आवाहन- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

राज्य प्रतिनिधी-जगभरात सुरू असलेल्या विविध संघर्षांवर भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि स्थैर्याचे आवाहन केलं आहे. जेव्हा दोन लोकशाही एकत्र येतात तेव्हा शांततेसाठी आवाज आणखी तीव्र होतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले

पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती आमच्यासाठी खोल चिंतेचा विषय आहे. भारत संवाद आणि राजनैतिक कूटनीतिद्वारे सर्व वाद सोडवण्यास पाठिंबा देतो. या प्रदेशात उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व देशांसोबत काम करत राहू. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

vishwatmaklokswamivarta

राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

भारतीय हवामान खात्याच्या  जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा — रोहयो मंत्री भरत गोगावले #शिवराज्याभिषेक रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या. महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ. त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की,शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा,मंडप,खानपान, राजशिष्टाचार,परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी महत्वाकांक्षी सायबर सुरक्षा प्रकल्प- गृह राज्यमंत्री योगेश कदम