vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन हा संघ कमाल…. हा विजय ऐतिहासिक!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदनहा संघ कमाल…. हा विजय ऐतिहासिक!

मुंबई, प्रतिनिधी आयसीसीच्या टि ट्वेंटी विश्वचषकाच्या सलग दुसऱ्या स्पर्धेत विश्वचषकांवर नाव कोरण्याची भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट आहे. ही कामगिरी आणि खेळी क्रिकेट जगत कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे या ऐतिहासिक विजयासाठी जिगरबाज भारतीय क्रिकेटपटूंचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच जिगरबाज खेळी केली. संजू सॅमसन यांच्यासह फलंदाजांनी धुवांधार धावा काढल्या तर गोलंदाजानी कमाल दाखवली. अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला गारद केले. क्षेत्ररक्षणातही ईशांत किशन, तिलक वर्मा यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यासाठीची खिलाडू वृत्ती, मेहनत यांचे दर्शन भारतीय संघाने घडवले. या ऐतिहासिक विजयात संघातील सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक – मार्गदर्शक, व्यवस्थापनातील अधिकारी – कर्मचारी असे सर्वांचे निश्चितच योगदान आहे. भारतीयांच्या क्रिकेट प्रेमाची सार्थ ओळख जगाला करून देण्याची कामगिरी आपल्या भारतीय संघाने केली आहे. त्यासाठी या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

श्री तुळजाभवानी देवीचे सोने वितळवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारलेली असतांनाही प्रशासनाचा अट्टाहास कशासाठी*धाराशिवचे जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव व गृह सचिव यांना बजावली ‘न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस’*

vishwatmaklokswamivarta

३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई

गडचिरोलीत रानहत्तींचा वावर: रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका; वनविभागाचे नागरिकांना आवाहन*

भिम पदयात्रेद्वारे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

जालना जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या  शाळांवर बाल हक्क आयोगाची थेट कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना अर्धन्यायिक सुनावणीचे समन्स,विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका, वृत्तांची ‘सुओ-मोटो’ दखल७ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी, अहवाल न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

मराठवाड्यात पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी सूक्ष्म नियोजन करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर पाणीटंचाई व पाणीपुरवठा योजनांचा विभागीय आढावा

vishwatmaklokswamivarta