vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विशेष वृत्त :सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे पीडित महिलांच्या हक्काचा आधारवड

विशेष वृत्त :सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे पीडित महिलांच्या हक्काचा आधारवड

 

जालना, प्रतिनिधी :- समाजातील पीडित असलेल्या महिलांच्या पाठीशी उभे राहत लढा देवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे पीडित महिलांसाठी हे केंद्र हक्काचे आधारवड ठरत आहे. याठिकाणी एकाच छताखाली सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात आहेत. जालना जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात (घाटी) सखी वन स्टॉप सेंटर जुन 2019 पासून कार्यान्वित आहे. केंद्राचा संपर्क क्रमांक 9422261516 असा असून एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर मदत, समुपदेशन, गरज असल्यास आश्रयाची सोयही उपलब्ध करू दिली जाते. त्यामुळे समाजातील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ते चालवले जाते. शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, अॅसिड हल्ला किंवा सायबर क्राईममधील अत्याचारास बळी पडलेल्या महिलांना पोलिस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. अशावेळी सखी वन स्टॉप सेंटर पीडितेच्या पाठीशी उभे राहून लढा देत न्याय मिळवून देत आहे. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषण, हुंडाबळी, छळ, जाच, अॅसिड हल्ले, आणि बाल लैगिंक शोषणग्रस्त पीडितांना या ठिकाणी मदत केली जाते.सहा प्रकारची केली जाते मदत :-पीडित महिलांना कायदेशीर मदत, पोलिस मदत, समुपदेशन, वैद्यकीय मदत, तात्पुरता निवारा, व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा, पोलिस सहाय्यता आदींची मदत देतात. हे कार्यालय 24 तास सुरु असते. त्यासाठी 13 कर्मचारी आहेत. गरजेनुसार त्यांना पाच दिवसाचा तात्पुरता निवारा दिला जातो. सद्यस्थितीत केंद्रामध्ये एकाच वेळी 5 महिला व्यवस्थित राहू शकतील एवढी क्षमता या निवारा गृहाची आहे.महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध सेवा :  या अडीच वर्षांच्या कालावधीत या सेंटरने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या मदतीने जुन 2019 ते मार्च 2026 या कालावधीत आजपर्यंत 875 पीडित महिलांच्या विविध समस्यांवर निवारण करुन त्यांना विविध सेवा उपलब्ध करुन देत न्याय देण्याचे कार्य केले आहे. तसेच वकिल ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. – श्रीमती वनिता पिंपळे, केंद्र व्यवस्थापक, जालना

तातडीच्या मदतीसाठी 181 हेल्पलाइन :- तातडीच्या मदतीसाठी शासनाचा 181 हा महिला हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित आहे. जालना जिल्ह्यातील गरजू आणि संकटग्रस्त महिलांनी कोणत्याही भितीशिवाय या क्रमांकावर किंवा सखी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र कड, आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र व्यवस्थापक वनिता पिंपळे यांनी केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

उत्तरकाशी भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, बहुतांश पर्यटक आज राज्यात परतणार-आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

खुलताबाद कडे जाणाऱ्या वाहतुक मार्गात बदल

पालकांच्या कृतीशिलतेतून पाल्यांमध्ये वाचन संस्कृती रूजेल – बालसाहित्यिक प्रशांत वि. गौतम

vishwatmaklokswamivarta

समाजकल्याण विभागाचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव आजपासून

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या तळेरे–करूळ घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरूसिंधुदुर्ग जिल्ह्याला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या तळेरे–करूळ घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

vishwatmaklokswamivarta