vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

टी. सी. महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

टी. सी. महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

पुणे प्रतिनिधी-बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय तसेच अनेकांत फार्मसी महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात सुमारे २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदानाची शपथ घेतली. दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग दर्शविला.

निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. बारामती तालुका मतदान प्रचार-प्रसिद्धी प्रमुख सौ. सविता खारतोडे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी तसेच मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, डॉ. दर्शन शहा तसेच परीक्षा विभाग प्रमुख डॉ. वैशाली पाटील उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत मतदानाबाबत जागरूक राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला;वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र देऊन कार्याचा गौरव करण्यात आलासंविधान हत्या दिवस-2025 कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीतील चित्रांचे प्रदर्शन महिनाभर खुले राहणार..

शबरी नॅचरल्स’चा डंका आता दिल्लीपर्यंत; केंद्रीय जनजातीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुकाची थाप

सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखकांची भरती; 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्याअंतर्गत सुरक्षेचा आढावा…

विधानपरिषद लक्षवेधी :नाशिक जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक व मानसिक छळ प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई-ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे