vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मोरा गावातील मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावा -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मोरा गावातील मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावा -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी:- जे. एन. पी. ए. मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा मच्छीमार सोसायटी तसेच मोरा (ता. उरण जि. रायगड) गावातील मच्छीमार यांच्या झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाने नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला आमदार महेश बालदी, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.

मोरा मच्छीमार सोसायटी तसेच मोरा गावातील मच्छीमार यांना नुकसान भरपाई देण्यासाठी याचे वर्गीकरण करून त्याबाबतचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले

गस्ती नौका, ड्रोन खरेदीचा आढावा,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या पाच गस्ती नौका व ड्रोन खरेदी बाबतचा आढावा घेतला. गस्ती नौका व ड्रोन खरेदी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

०००००

संबंधित पोस्ट

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा काढून सिन्दुर ऑपरेशनचा विजय साजरा*

महाराष्ट्राने दूरदृष्टी नेतृत्व गमावले-अजितदादा पवार यांना सर्व पक्षीय शोकसभेत श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान-महाराष्ट्रातील प्रतिभांचा विज्ञान भवनात सन्मान

vishwatmaklokswamivarta

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून मयताच्या वारसास महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिला दोन लाखाचा धनादेश..

vishwatmaklokswamivarta

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर पुरस्कारप्राप्त कलाकरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta