vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी २६ एप्रिल २०२६ रोजी मतदान-सातारा जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी २६ एप्रिल २०२६ रोजी मतदान-सातारा जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

सातारा प्रतिनिधी: महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार आणि उमेदवारांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्र आणि वेळः या निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात एकूण २०७५ मतदार असून त्यांच्या सोयीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत

1. केंद्र क्र. १ (फिल्ड हॉस्पिटल खोली क्र. १): मतदार अनुक्रमांक १ ते १०००

2. केंद्र क्र. २ (फिल्ड हॉस्पिटल खोली क्र. २): मतदार अनुक्रमांक १००१ ते २०७५

मतदानाची वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५ओळखीसाठी आवश्यक कागदपत्रेः मतदान केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी मतदारांना खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र (Original ID) सादर करणे अनिवार्य आहे:महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र (फोटो नसल्यास अन्य फोटो आयडी आवश्यक). परिषदेने दिलेले अधिकृत ओळखपत्र.भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले छायाचित्रसहित ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, मतदार कार्ड, इत्यादी).

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन, वायरलेस संच किंवा कॅमेरा नेण्यास सक्त प्रतिबंध करण्यात आला आहे.उमेदवारांना मतदारांच्या मदतीसाठी मतदान केंद्राच्या १०० मीटर मर्यादेबाहेर १० फूट बाय १० फूट आकाराचा एक छोटा तंबू (२ खुर्चा, १ छत्री व लॅपटॉपसह) स्वखर्चाने उभारता येईल.लोकशाहीच्या या प्रक्रियेत पात्र सर्व डॉक्टरांनी (मतदारांनी) आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात

शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल      – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईनचे उद्‌घाटन- सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू- हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8808806088064

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट—-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

कोल्हापूर कागल तालुक्यातील सिद्धिविनायक सोसायटी कुटुंब मेळा संपन्न

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…