vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यपरदेशात देश

जागतिक आरोग्य संघटनेकडून इबोला उद्रेक ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित; आफ्रिका रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून ‘खंडांतर्गत सुरक्षिततेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित

जागतिक आरोग्य संघटनेकडून इबोला उद्रेक ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित; आफ्रिका रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून ‘खंडांतर्गत सुरक्षिततेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित..भारत सरकारचा नागरिकांना काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, युगांडा आणि दक्षिण सुदान इथे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला..

I

विदेश प्रतिनिधी-काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि युगांडामध्ये इबोला आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने ‘आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम, 2005’ अंतर्गत, 17 मे 2026 रोजी ही परिस्थिती ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ असल्याचे जाहीर केले आहे.

आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानेसुद्धा काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि युगांडावर परिणाम करणाऱ्या ‘बुंदिबुग्यो प्रजाती इबोला विषाणू’ आजाराच्या सध्याच्या उद्रेकाला ‘खंडांतर्गत सुरक्षिततेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे.

याशिवाय, जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम आणीबाणी समितीने 22 मे 2026 रोजी प्रवेशाच्या ठिकाणी रोगावर देखरेख मजबूत करण्यासाठी तात्पुरत्या शिफारशी जारी केल्या आहेत, यामुळे “बुंदिबुग्यो व्हायरसचे अस्तित्व आढळलेल्या भागातून येणाऱ्या आणि स्पष्ट कारण नसलेला ताप असलेल्या प्रवाशांचा शोध घेणे, मूल्यांकन करणे, अहवाल देणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे” शक्य होईल आणि त्याच वेळी लोकांनी बुंदिबुग्यो विषाणू आढळलेल्या भागात प्रवास न करण्यासाठी उद्युक्त केले जाईल.

काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि युगांडाच्या सीमांना लागून असलेल्या दक्षिण सुदानसह इतर देशांमध्ये या आजाराचा प्रसार होण्याचा धोका जास्त असल्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

इबोला हा आजार इबोला विषाणूच्या बुंदिबुग्यो विषाणू प्रजाती’च्या संसर्गामुळे होणारा एक विषाणूजन्य रक्तस्रावकारक ताप आहे. हा एक गंभीर आजार असून यामध्ये मृत्यूचा दर जास्त आहे. सध्या, बुंदिबुग्यो विषाणू प्रजातीमुळे होणाऱ्या इबोला आजाराला रोखण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी कोणतीही लस किंवा विशिष्ट उपचार मंजूर केलेले नाहीत.भारतात बुंदिबुग्यो विषाणू प्रजातीमुळे होणाऱ्या इबोला आजाराचे एकही प्रकरण नोंदवले गेलेले नाही.

काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि इतर बाधित देशांमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसींनुसार, भारत सरकार सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, युगांडा आणि दक्षिण सुदानचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देत आहे.

सध्या या देशांमध्ये राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा आणि अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

000000

 

संबंधित पोस्ट

कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

अमेरिकेच्या राज्य विभागाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तिच्या सशस्त्र शाखा ‘मजीद ब्रिगेड’ला परकीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित ..

कोलंबियात भीषण विमान अपघातात ६६ जणांचा मृत्यू, ४८ जणांना वाचवण्यात यश.

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारØ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

युगांडामधील इबोला रोगाचा ताजा उद्रेक आता जागतिक स्तरावर होत आहे  336 संशयित रुग्ण अन् 88 मृत्यू, इबोला उद्रेक; कोविडसारखी परिस्थिती ?

विशेषत दहशतवाद हा केवळ वैयक्तिक राज्यांच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान असल्याचे शांघाय शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

vishwatmaklokswamivarta