
भारत अभियानः विकसित भारताची ओळखदेशव्यापी जनजागृती मोहिमेचे आयोजन
सातारा प्रतिनिधी :- माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या वतीने संपूर्ण देशात नशामुक्त भारत अभियानः विकसित भारताची ओळख” या मध्यवर्ती संकल्पनेवर (Theme) आधारित विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ जून २०२६ ते २६ जून २०२६ या कालावधीत जिल्हा आणि तालुका पातळीवर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे.
एक सशक्त, समृद्ध आणि ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी देशातील युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने या १० दिवसांच्या कालावधीत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, ग्रामपंचायती, नगरपरिषद, तसेच शासकीय कार्यालयांच्या समन्वयाने विविध जनजागृतीपर खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत. सदर सप्ताहामध्ये होणाऱ्या कार्यक्रम व कार्यक्रमाची लिंक या खालील प्रमाणे आहेत.
ऑनलाईन व्यसनमुक्ती शपथ लिक (Online Mass pledge against drug abuse at) ttps://nmba.dosje.gov.in/content/take-a-pledge. NMBA चितत्रपट / लघुपट (Screening of short awareness films in schools/colleges / GIA centres. NMBA films are available at) लिक https://tinyurl.com/ztzktre”My Gov Quiz लिक Nasha Mukt Bharat Abhiyaan Quiz. Poster Making/Slogan Writing/Essay Competition लिंक https://forms.gle/4T6xKEPkWX1t3GmU7%0A%0A.लिंक नशामुक्ती मित्र नोंदणी मोहिम लिंक https://nmba.dosje.gov.in/volunteer/registration
विकसित भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होऊ शकते, जेव्हा आपला देश आणि येथील तरुण पिढी निरोगी आणि नशामुक्त असेल. व्यसनाधीनता केवळ एका व्यक्तीला नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला उद्ध्वस्त करते. त्यामुळे या राष्ट्रव्यापी मोहिमेत प्रत्येक नागरिकाने, सामाजिक संस्थेने आणि तरुण मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.
0000



