vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सुपर वुमन बाईक रॅलीने महिला दिन साजरा-महिलांनो स्वतःच्या क्षमता ओळखा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सुपर वुमन बाईक रॅलीने महिला दिन साजरा-महिलांनो स्वतःच्या क्षमता ओळखा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागातील महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांची सुपर वुमन बाईक रॅली काढण्यात आली. क्रांती चौकापासून सुरु झालेल्या या रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप झाला.

 महिला या शक्तीचे स्वरुप असतात, गरज आहे ती फक्त महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखण्याची, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महिलांचा आत्मविश्वास वाढवला.

 आज सकाळी साडेसात वा. क्रांती चौकात महिलांच्या बाईल रॅलीचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, शिक्षणाधिकारी माध्यमिक आश्विनी लाठकर, शिक्षणाधिकरी प्राथमिक जयश्री चव्हाण तसेच प्रशासनातील महिला अधिकारी – कर्मचारी या रॅलीत उत्साहात सहभागी झाल्या. रॅलीत महिला सक्षमीकरणाच्या घोषणांनी परिसर निनादून गेला. पैठण गेट, तापडिया रंगमंदिर मार्ग, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत औरंगपुरा भाजी मंडी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या रॅलीचा समारोप झाला.

 जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. महिला ह्या समाजाचा निम्मा भाग आहे. त्यांची बुद्धिमत्ता, शक्ती याचा उपयोग झाल्यास आपला समाज अनेक क्षेत्रात आघाडीवर जाईल.त्यासाठी महिलांनी स्वतःच्या क्षमतांना ओळखून त्याचा विकास करायला हवा,असे प्रतिपादन त्यांनी केले.

 प्रास्ताविक संगिता राठोड ह्यांनी तर आभार आश्विनी लाठकर यांनी मानले.

०००००

संबंधित पोस्ट

सत्याचा विजय’; मात्र षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा झाल्यावरच संपूर्ण न्याय मिळेल ! – सनातन संस्थेची भूमिका…

शासकीय मराठी लेखनाप्रमाणेच युवकांसाठी करिअरच्या संधींवर लेखक श्री.सुरेश वांदिले यांचा मार्गदर्शक संवाद*..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील दि. 1 एप्रिल 20219 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर,हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ..

निम्न पेढी प्रकल्पातील नागरिकांना घरकुल मंजूर-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

भारत सरकार पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

नवरात्रोत्सवनिमित्त महिला सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची इतरांसाठी प्रेरणादायी विशेष लेखमालिका क्रमश:

vishwatmaklokswamivarta