vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कायदेशीर दत्तक प्रक्रियेतूनच बालकांना सुरक्षित भविष्य द्यावेजिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन*बालकांची खरेदी-विक्री हा गंभीर गुन्हा

कायदेशीर दत्तक प्रक्रियेतूनच बालकांना सुरक्षित भविष्य द्यावेजिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन*बालकांची खरेदी-विक्री हा गंभीर गुन्हा

अमरावती, प्रतिनिधी अमरावती शहरात बालविक्री व मानवी तस्करीसंदर्भात समोर आलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. बालकांची खरेदी-विक्री करणे, आर्थिक मोबदल्यात बालकांचे हस्तांतरण करणे अथवा दत्तकाच्या नावाखाली कोणताही बेकायदेशीर व्यवहार करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारांपासून नागरिकांनी दूर राहून शासनमान्य कायदेशीर दत्तक प्रक्रियेचाच अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे

बालक दत्तक घेणे ही केवळ कौटुंबिक इच्छा नसून ती बालकाच्या आयुष्याशी निगडित मोठी जबाबदारी आहे. अनाथ, परित्यक्त आणि समर्पित बालकांना कुटुंबाचा आधार मिळावा, हा या प्रक्रियेचा मूळ हेतू आहे. मात्र, काही वेळा मध्यस्थांमार्फत बालक मिळविणे, पैशांच्या मोबदल्यात ताबा घेणे, खोटी जन्मनोंदणी करणे किंवा खासगी कराराच्या आधारे दत्तक प्रक्रिया झाल्याचे भासविणे, असे प्रकार घडण्याची शक्यता असते.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, बालकांची खरेदी-विक्री किंवा बेकायदेशीर हस्तांतरण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांनी अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थांशी संपर्क न साधता शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फतच प्रक्रिया पूर्ण करावी आणि सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही दिले आहेत.

कायदेशीर दत्तक प्रक्रिया ‘कारा’च्या माध्यमातूनच केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण हे केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत वैधानिक प्राधिकरण असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ व दत्तक विनियम, २०२२ नुसार दत्तक प्रक्रिया राबविली जाते. इच्छुक व पात्र पालकांनी CARA च्या CARINGS या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पात्रतेची पडताळणी, गृहचौकशी, बालकाची कायदेशीर उपलब्धता, सामाजिक व वैद्यकीय अहवाल आणि नियमानुसार दत्तक आदेशाची कार्यवाही पूर्ण केली जाते.

संशयित बाब निदर्शनास आल्यास तात्काळ संपर्क साधावा. दत्तक प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार किंवा अनधिकृत मध्यस्थी करू नये, तसेच जन्म प्रमाणपत्राचा गैरवापर करून चुकीची माहिती नोंदविणे, पालकत्व अनधिकृतरीत्या बदलणे किंवा बालकांची विक्री करणे हे गंभीर प्रकार असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी नमूद केले आहे. बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित संशयास्पद बाब आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस विभाग, बाल कल्याण समिती किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत बालकांचे संरक्षण, काळजी, समुपदेशन आणि पुनर्वसनासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

दत्तक घेण्यासाठी नागरिकांसाठी बालक दत्तक घेण्यासाठी केवळ अधिकृत CARA, CARINGS प्रक्रियेचाच अवलंब करावा. एजंट किंवा मध्यस्थांमार्फत बालक घेऊ नये व पैशांच्या मोबदल्यात बालकांची देवाण-घेवाण करू नये. जन्म प्रमाणपत्र किंवा खासगी करार हा कायदेशीर दत्तक आदेशाचा पर्याय ठरू शकत नाही. संशयास्पद घटनांची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणांना द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी नागरिक cara.wcd.gov.in या संकेतस्थळ आणि carings.wcd.gov.in या पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

दक्षिण दिल्लीतील साकेत मेट्रो स्थानकाजवळ एक व्यापारी इमारत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.13 जखमी लोकांवर उपचार सुरू

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

जनगणना २०२७ च्या कामास जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे- मुख्य सचिव राजेश अग्रवाल १० ते २४ जानेवारीदरम्यान स्वयं-गणना; २५ जानेवारीपासून घरोघरी लोकसंख्या गणना

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 5 शहरांना शहर स्वच्छतेसाठी मार्गदर्शक शहर म्हणून नवी मुंबईची प्रभावी कामगिरी-‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रम..

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत १६ विद्यार्थी व कुटुंबीयांना लाभ मंजूर