vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विकसित भारत जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा उत्साहात विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त भारत’ व्यक्त केले विचार

विकसित भारत जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा उत्साहात विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त भारत’ व्यक्त केले विचार

अमरावती, प्रतिनिधी : युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या मेरा युवा भारततर्फे विकसित भारत जिल्हास्तरीय युवा संसद स्पर्धा उत्साहात पार पडली. पोटे पाटील कॉलेजच्या संत गाडगेबाबा सेमिनार हॉलमध्ये ही स्पर्धा शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी पार पडली. यात विद्यार्थ्यांनी ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ या विषयावर विचार व्यक्त केले.

युवकांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, वैचारिक प्रगल्भता आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, तसेच विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी मेरा युवा भारतच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेमध्ये १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींनी मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमधून तीन मिनिटांच्या कालावधीत आपले विचार प्रभावीपणे मांडले. व्यसनमुक्त समाजनिर्मिती, युवकांची सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्यांवर स्पर्धकांनी मते व्यक्त केली.

स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून पोटे पाटील कॉलेजचे प्राचार्य प्रदीप जवंधिया, मेरा युवा भारत जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे उपस्थित होते. परीक्षक म्हणून विशाल तिजारे, प्रा. डॉ. शुद्धोधन कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार, पोटे कॉलेजचे डॉ. ए. पी. धांडे, प्रा. के. के. नगरिया यांनी कामकाज पाहिले.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन स्पर्धकांची राष्ट्रीय युवा संसद २०२७ साठी निवड करण्यात आली. यात प्रतीक्षा शिंदे, गौरव देशमुख, भक्ती इंगळे यांचा समावेश आहे. विजेत्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे व विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून समाजामध्ये जनजागृती निर्माण करावी आणि राष्ट्राच्या विकासकार्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रा. नंदा सुनप्रीत यांनी सूत्रसंचालन केले. मेरा युवा भारतचे लेखापाल अजिंक्य गवळी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी नरेंद्र घुरडे, स्नेहल वानखेडे यांनी पुढाकार घेतला.

00000

संबंधित पोस्ट

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची ग्वाही• शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास शासन कटिबद्ध• सोनखेड व लोहा येथे पीक परिस्थितीची केली पाहणी• पिण्याचे पाणी, चारा व शिक्षणासाठीही मदत देणार

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज -उत्तम दिघे

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही

vishwatmaklokswamivarta

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान