vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

कोकण विभागात रब्बी हंगाम पूर्वतयारी व जलसंधारणास प्राधान्य:कृषी विभागाचे आवाहन

कोकण विभागात रब्बी हंगाम पूर्वतयारी व जलसंधारणास प्राधान्य:कृषी विभागाचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी:- कोकण विभागामध्ये सध्या निमगरव्या व गरव्या भात जाती काढणीच्या अवस्थेत असून, शेतकऱ्यांनी सकाळी वैभव विळयाच्या साहाय्याने कापणी करून धान्याची सुरक्षित स्थळी मळणी करावी आणि लोंबीतील आद्रतेचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य पद्धतीने वाळवणी करावी, असे आवाहन कृषी विभातर्फे करण्यात आले आहे. भात काढणी पूर्ण झालेल्या क्षेत्रावर बियाण्याची उपलब्धता पाहून हरभरा पिकाची ३० गुणिले १० सें.मी. अंतरावर टोकण पद्धतीने पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करून २५:५०:५० किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. तसेच हरभरा पिकासाठी 100 किलो सेंद्रीय खतामध्ये 5 किलो ट्रायकॉर्डमा मिसळून मात्रा द्यावी.

ज्या भागांत निमगरव्या व गरव्या भात जातींची काढणी पूर्ण झाली आहे, तेथे जमिनीतील अंगओलावा लक्षात घेऊन वाल पिकाची पेरणी करावी. पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या क्षेत्रात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि मशागतीचा खर्च व वेळ वाचवण्यासाठी शून्य मशागत पेरणीचा अवलंब करावा. यासाठी खरीप भात काढणीनंतर ग्लायफोसेट या अनिवडक तणनाशकाची फवारणी करून टोकण पद्धतीने लागवड करावी. सिंचनाची पुरेशी सुविधा असलेल्या क्षेत्रात जमीन तयार करून योग्य अंतरावर पेरणी करावी आणि बियाण्यांस रायझोबियम व थायरमची बीजप्रक्रिया आवर्जून करावी.

सध्याची दुष्काळी परिस्थिती व भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, नारळ, सुपारी, आंबा आणि काजू या फळबागांना ठिबक सिंचनाद्वारे संरक्षित पाणी द्यावे. आंबा बागेत मोहोर प्रक्रिया सुरू होण्यासाठी साफसफाई करून ताण बसू द्यावा आणि नवीन पालवीवर तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रिनची फवारणी करावी. चिकू बागेमध्ये स्वच्छता राखून बोर्डो मिश्रण व आवश्यक पोषक घटकांची फवारणी करावी. तसेच हळद पिकात गड्डे तयार होण्याच्या अवस्थेत युरियाचा शिफारशीत हप्ता देऊन मातीची भर द्यावी.

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेताजवळील ओढे व नाल्यांवर ‘कोकण विजय बंधारा’ किंवा दगडी बंधारे उभारून जलसंधारण करावे. यामुळे भूजल पुनर्भरण होण्यास आणि रब्बी हंगामातील पिकांना पूरक सिंचन मिळण्यास मदत होईल. तसेच जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासल्यास फुलोरा अवस्थेतील हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून साठवण करावी आणि कुक्कुटपालन शेडमध्ये तापमानाचे योग्य नियंत्रण ठेवावे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विद्यापीठ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

२५ ऑगस्ट ठाण्यात ‘आनंद चित्र कथा’२५ व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रकलेच्या प्रदर्शनातून धर्मवीर आनंद दिघेसाहेबांना आदरांजली

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालयासह अन्य विकासकामांनाही गती द्यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वनविभागाला निर्दे · अनावश्यक वन्यजीव परवानग्यांचे अडथळे दूर करावेत· बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीवर भर· ग्रामसभांशी सुसंगत सामूहिक वनहक्क समित्यांवर भर

vishwatmaklokswamivarta

युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश; बारवाले महाविद्यालयात युवा संसद.

vishwatmaklokswamivarta

तांदुळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून’प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण