vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी):बालकांचे भविष्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वावलंबनाला प्राधान्य देत जिल्ह्यातील बालकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
 जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना येथील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाला सदिच्छा भेट देऊन संस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संस्थेतील विविध समस्यांबाबत, बालकांच्या गरजा, शिक्षण आणि प्रगतीबाबत आस्थेवाईकपणे संवाद साधला. तसेच संस्थेतील विधिसंघर्षग्रस्त बालके आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या संगोपन व संरक्षणाचा आढावा घेतला.
बालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना स्वावलंबी बनता यावे, यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. बालकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी चित्रकला, योगासने आणि प्राणायाम यांसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बालकांच्या मानसिक आरोग्याबाबत संवेदनशील भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मानसोपचार तज्ज्ञांमार्फत बालकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. बालकांना केवळ निवारा व सुविधा देणे पुरेसे नसून त्यांना भावनिक आधार, योग्य मार्गदर्शन आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी मित्तल यांनी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीप्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र कड, बाल कल्याण समितीचे सदस्य तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

शासनाच्या योजनांचा लाभ पात्र गोरगरीब लाभार्थी पर्यंत पोहोचवा–राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे*

vishwatmaklokswamivarta

कृषी पुरस्कारासाठी ऑनलाईन सुविधा*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसानभरपाईसाठी,नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात …

आप खासदार राघव चढ्ढा, संदिप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह दोन तृतीयांश खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात विलीन …

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावेजिल्ह्यातील मंडळांना ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta