vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शासनाच्या योजनांचा लाभ पात्र गोरगरीब लाभार्थी पर्यंत पोहोचवा–राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे*

शासनाच्या योजनांचा लाभ पात्र गोरगरीब लाभार्थी पर्यंत पोहोचवा–राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे*

 

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी- राज्य शासनाच्या पुरवठा व शिक्षण विभागाकडून गोरगरीब लाभार्थीकरिता अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ पात्र गोरगरीब लाभार्थी पर्यंत पोहचवा असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी आज येथे उपस्थितांना दिले.

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित नियतन, उचल व वाटप, शालेय पोषण आहारबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

     यावेळी अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी सा.प्र.रविंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

      यावेळी मार्गदर्शन करताना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष श्री. ढवळे म्हणाले की, रास्त धान्य दुकानातून लाभार्थींना दिलेले धान्याचा दर्जा अधिकाऱ्यांनी तपासला पाहिजे. लाभार्थींना त्यांच्या हक्काच धान्य त्यांना मिळते की नाही ते पहाणे ही आपली जबाबदारी आहे. रास्तधान्य दुकानदार वेळेत दुकान उघडतो किंवा नाही तसेच त्या दुकानाच्या दर्शनी भागात रास्त धान्य दुकान अशा ठळक अक्षरात बोर्ड लावणे बंधनकारक आहे.

     सध्या पावसाच्या अभावामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. या दुष्काळ परिस्थितीत पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहता कामा नये. रायगड जिल्ह्यात आदिवासी लोकवस्ती मोठया प्रमाणात आहे. त्या आदिवासींच्या वाडीवस्त्यावर भेट देवून त्यांना शासनाच्या योजनांची माहिती समजावून सांगून त्याचा लाभ त्यांना द्यावा. पात्र लाभार्थींना कायद्याच्या चौकटीत बसून योजनांचा लाभ द्यावा. कोणीही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहता कामा नये. कोणीही लाभार्थी उपाशी झोपता कामा नये, खऱ्या लाभार्थीपर्यंत योजनेचा लाभ पोहचविणे आपले कर्तव्य म्हणून काम करावे, असे आवाहन करून ते म्हणाले की, अंगणवाडीत लहान मुलांना पोषक पुरक आहार देण्यात यावा, जेणेकरुन त्यांची वाढ चांगल्या पध्दतीने होईल.मुलांच्या शालेय पोषण आहाराबाबत पालकांच्या बैठका घेवून त्यांना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करावे. तसेच स्तनदा माता, गरोदर मातांना मातृवंदना, लेकलाडकी या योजनांचा लाभ दिला जावा. स्तनदा माता, गरोदर मातांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

००००००००

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक तर भाग घेणाऱ्या स्पर्धकांनाही मिळणार प्रशस्तीपत्र 

कोटगलचा एल्गार: दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर!

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण

लातूर ग्रामीणच्या विकासपर्वाचे शिल्पकार आदरणीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा…👏🏻🎂🎊

बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांचे मानधन उपस्थितीच्या पडताळणीनंतरच अदा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे