vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चारा, पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी जिल्ह्यात काटेकोर नियोजन**टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा सज्ज; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई*

*चारा, पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी जिल्ह्यात काटेकोर नियोजन**टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा सज्ज; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई*

सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई आणि जनावरासाठीच्या चारा टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच काटेकोर नियोजन करावे. जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना चारा बियाणे मोफत वाटप करावे. उपलब्ध पडीक व अडचणीच्या क्षेत्रावरही बियाणे वाटप करून चारा उत्पादनाला चालना द्यावी. धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करताना पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या गरजांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री श्री देसाई बोलत होते.

यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार सर्वश्री धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे उपवनसंरक्षक अमोल सातपुते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने चारा बियाणे वाटपाचे नियोजन प्रभावीपणे करावे. केवळ बियाणे वाटप न करता ते योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे का, याची खात्री करावी. उपलब्ध क्षेत्राचा पुरेपूर वापर करून चारा उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन पाणी वाटपाचे काटेकोर नियोजन करावे. शहरी भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजनही उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन करावे.

टंचाई आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर पुढील आठ दिवसांत बैठका घेऊन स्थानिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन तालुकानिहाय अंतिम टंचाई आराखडे तयार करावेत. या आराखड्यांच्या आधारे टंचाई निधीचे योग्य पद्धतीने वाटप करून आवश्यक कामे वेळेत पूर्ण करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्या ठिकाणी नैसर्गिकरीत्या जीवंत पाण्याचे झरे उपलब्ध आहेत, अशाच ठिकाणी तात्पुरत्या नळपाणीपुरवठा योजना राबवाव्यात. या योजनांची उपयुक्तता तपासूनच त्यांना मंजुरी द्यावी. तसेच विंधन विहिरींच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. आवश्यकतेनुसार विंधन विहिरी खोदण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी लागणारी यंत्रे अधिग्रहित करण्याची कार्यवाही करावी.

टंचाई निवारणाची कामे केवळ कागदोपत्री न करता सर्व संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन परिस्थितीची पाहणी करावी. प्रत्येक कामावर नियमित देखरेख आणि नियंत्रण असावे. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामे योग्य पद्धतीने आणि दर्जेदार होत असल्याची खात्री करावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

जलसंधारण विभाग आणि जिल्हा परिषद यांनी त्यांच्या अखत्यारीतील जुन्या बंधाऱ्यांची स्थिती तपासून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे नियोजन करावे. पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी अडविणे आणि त्याचा योग्य विनियोग करणे यासाठी जलसंधारणाच्या कामांना महत्त्व द्यावे.

संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी जबाबदारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. प्रशासनाला दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून चारा, पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देशही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

जालना तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने शोककळा

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये २८ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू. 

vishwatmaklokswamivarta

शासकीय मुलामुलींचे वसतिगृह येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी रेणुका राठोड यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत जवळ जवळ 150 मूल व मुली यांना वाहन चालवण्याचा परवाना,

vishwatmaklokswamivarta

पुढील दोन वर्षांत जालना जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांचा दर्जेदार विकास करा-आढावा बैठकीत पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे निर्देश’नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेसह राज्याने जालन्याचा आदर्श घ्यावा असे काम करा…

vishwatmaklokswamivarta

सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर शिर्डीतील सेवा सुविधा बाबत आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta