vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यात 75 टँकरव्दारे 67 गावे, 486 वाड्यातीलएक लाख 45 हजाराहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

जिल्ह्यात 75 टँकरव्दारे 67 गावे, 486 वाड्यातीलएक लाख 45 हजाराहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

        सांगली प्रतिनिधी, : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच स्थानिक पातळीवर खाजगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या 24 नोव्हेंबर अखेरच्या अहवालानुसार 67 खाजगी व 8 शासकीय अशा एकूण 75 टँकरव्दारे 67 गावे व 486 वाड्यातील 1 लाख 45 हजार 234 बाधित लोकसंख्येला व 99 हजार 816 पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 30 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित केल्या आहेत.

     जत तालुक्यातील टंचाईग्रस्त 57 गावे व 414 वाड्यांमधील सुमारे 1 लाख 24 हजार, 867 लोकसंख्येला आणि 81 हजार 222 पशुधनाला 64 टँकरद्वारे (57 खाजगी व 7 शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात 18 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून 4 डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत.

  कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त 2 गावे व 15 वाड्यांमधील 3180 लोकसंख्येला आणि 2382 पशुधनाला 2 टँकरव्दारे (1 खाजगी व 1 शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात 2 खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.    तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 6 वाड्यांमधील 855 लोकसंख्येला 1 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

       आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त 7 गावे व 51 वाड्यांमधील 16332 नागरिकांना आणि 16212 पशुधनाला 8 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात 4 विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.     खानापूर तालुक्यात 2 गावे टंचाईग्रस्त असून 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहे

0000

•

संबंधित पोस्ट

बुलढाणा जिल्ह्यात पोटनिवडणुकीची घोषणा

प्रासंगिक लेख / आंबेडकर जयंती / 14 एप्रिल 2026  बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट… 

आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा -डॉ. किरण लहामटे#सेवासंकल्पअभियान अंतर्गत राणी दुर्गावती जयंती निमित्त राजूर येथे आदिवासी महिला बचत गट मेळावा व शासकीय सेवा शिबिर संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुपा येथे आगमन व स्वागत…

vishwatmaklokswamivarta

आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा! मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत दोन ठिकाणी चरणसेवा उपक्रमांचे आयोजन

जलसेवा संकल्प अभियानातून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न-भूसंपादन, पुनर्वसन व वनजमिनींच्या प्रश्नांवर मार्गदर्शन; शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून शंकांचे निरसन

vishwatmaklokswamivarta