vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यात 23 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 7 डिसेंबर 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 7 डिसेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 डिसेंबर 2026 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

संबंधित पोस्ट

भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्वाची बैठक-जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपशावर बंदी जलस्रोतांच्या सुरक्षेसाठी भरारी पथके कार्यरत; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवा-रोजगार हमी मंत्री भरत गोगावले**’मागेल त्याला काजू’ व व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत काजू व आंबा घन लागवडीचा शुभारंभ*

vishwatmaklokswamivarta

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी व्हा -अंबिया बहार २०२६-२७ साठी आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी व संत्रा पिकांचा समावेश