vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

थेट कर्ज योजनेंतर्गत ८० लाभार्थ्यांची निवड*

*थेट कर्ज योजनेंतर्गत ८० लाभार्थ्यांची निवड*

सातारा प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजने अंतर्गत कर्ज प्रकरण दाखल केलेल्या अर्जदारांची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांच्या उपस्थितीत एकूण १३८ अर्जदारांपैकी सन २०२४-२५ मधील उद्दिष्टानुसार महिला १५ व पुरुष १५ असे एकूण ३० कर्ज प्रकरणांची सोडतीद्वारे चिड्डी काढून निवड करण्यात आली आहे. २०२५-२६ मधील उद्दिष्टानुसार २५ महिला व २५ पुरुष असे एकूण ५० कर्ज प्रकरणांची निवड करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत घनवट यांनी दिली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू घटकांचा आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने, रक्कम रु.एक लाख पर्यंत रक्कमेची थेट कर्ज योजना राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली दिली असून, सातारा जिल्ह्याकरिता सन २०२४-२५ करिता ३० व २०२५-२६ करिता ५० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते.

000

संबंधित पोस्ट

आज 🌧️ रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील शाळांना 2 जुलै  सुट्टी जाहीर केली

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत

व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करा-रोहयो मंत्री भरत गोगावले· वि6भागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टॉप (SMART) सोलार योजना

रायगड जिल्ह्यात पुढील ५ दिवस उष्ण व दमट हवामानाची शक्यता🌡️