vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालम येथे आयोजित ‘शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबिरा’चे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणीचे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

पालम येथे आयोजित ‘शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबिरा’चे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणीचे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्य प्रतिनिधी-पालम येथे आयोजित ‘शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबिरा’चे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणीचे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती सचिन एस. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सादराणी होते. यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, दिवाणी न्यायाधीश मनिषा एम. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण एम. काळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. टी. अडकिणे तसेच पालम तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शाम आर. रोकडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

या महाशिबिरात पालम तालुक्यासह परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच विधी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध शासकीय योजनांची माहिती, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ, आवश्यक कागदपत्रां बाबत मार्गदर्शन तसेच नागरिकांच्या कायदेविषयक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल व सेवा केंद्रे उभारण्यात आली होती.

महाशिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, पात्र लाभार्थ्यांना लाभाचे वितरण, विविध प्रमाणपत्रे व शासकीय सेवांबाबत मार्गदर्शन, तसेच कायदेविषयक हक्क, कर्तव्ये आणि न्यायप्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.स्वातंत्र्यानंतर प्रथमच पालम ते कोळवाडी दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एसटी बससेवा सुरू करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते बसचे अनावरण करून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ही बससेवा सुरू करण्यासाठी गंगाखेड आगाराच्या डेपो व्यवस्थापकांचे विशेष सहकार्य लाभले.

***

संबंधित पोस्ट

मुंबई लोकल ट्रेनमधील हत्येचा उलगडा: २४ तासांच्या आत आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत;एसआयआर अंतर्गत नमुना ६, ७ व ८ द्वारे अर्ज करण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज. खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यावी -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा-एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना  – अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

जालना येथे अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

vishwatmaklokswamivarta