vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

फिट इंडिया’ चळवळीतर्फे 29 नोव्हेंबर रोजी देशभरात ‘संडेज ऑन सायकल’च्या भव्य 100 व्या आवृत्तीचे आयोजन ऑलिम्पिक मूल्यांच्या सन्मानार्थ देशातील 100 प्रतिष्ठित ठिकाणी एकत्र सायकल चालवणार वरळी प्रोमेनेड कोस्टल रोड सायकल ट्रॅक येथे मुंबईचा सहभाग

फिट इंडिया’ चळवळीतर्फे 29 नोव्हेंबर रोजी देशभरात ‘संडेज ऑन सायकल’च्या भव्य 100 व्या आवृत्तीचे आयोजन,ऑलिम्पिक मूल्यांच्या सन्मानार्थ देशातील 100 प्रतिष्ठित ठिकाणी एकत्र सायकल चालवणार वरळी प्रोमेनेड कोस्टल रोड सायकल ट्रॅक येथे मुंबईचा सहभाग …

मुंबई प्रतिनिधी-युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, फिट इंडिया चळवळ, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOA) यांच्या संयुक्त विद्यमाने, माय भारत आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘फिट मुंबई’ उपक्रमाच्या सहकार्याने, ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’च्या ऐतिहासिक 100 व्या आवृत्तीचे आयोजन रविवार, 29 नोव्हेंबर 2026 रोजी देशभरातील 100 प्रतिष्ठित ठिकाणी करण्यात येणार आहे.या ऐतिहासिक उपक्रमाचे नेतृत्व केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया हे पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे करणार आहेत. देशभरातील नामवंत व्यक्ती, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज, क्रीडापटू, फिटनेसप्रेमी आणि नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

मुंबईत हा कार्यक्रम वरळी प्रोमेनेड कोस्टल रोड, सायकल ट्रॅक येथे आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6:00 वाजता होईल. सहभागी नागरिकांनी सकाळी 5:30 वाजेपर्यंत उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सामूहिक सायकल रॅली, फिटनेस उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आणि फिटनेसप्रेमींसोबत संवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.या विशेष आवृत्तीत माय भारतचे 1.5 लाखांहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार असून, सहभागी नागरिक ‘नशामुक्त भारत’ची शपथही घेणार आहेत. देशातील प्रत्येक जिल्ह्यात या उपक्रमाचे आयोजन करून भारतीय ऑलिम्पिक चळवळीच्या उत्सवात नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

ऑलिम्पिकच्या उत्कृष्टता, आदर आणि मैत्री या मूलभूत मूल्यांना समर्पित असलेल्या या 100 व्या आवृत्तीची संकल्पना ‘पेडलिंग टुवर्ड्स इंडियाज ऑलिम्पिक ड्रीम’ अशी आहे. भारतातील क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा गौरव करणे, सुदृढ भारत घडविण्यासाठी फिटनेस संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद भूषविण्याच्या देशाच्या आकांक्षेला बळ देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहेशारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्याबरोबरच, शहरांपासून गावांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांना एकत्र आणून सामूहिक सहभागाची भावना वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. या प्रवासातील 100 वी आवृत्ती हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, निरोगी आरोग्य, सुदृढ भारत आणि देशाच्या ऑलिम्पिक स्वप्नासाठी एकत्र सायकल चालविण्याचा संदेश यातून दिला जाणार आहे.

 

***

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 29.76 टी.एम.सी. पाणीसाठा

पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील ३ ते ४ तासांत जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह वीज पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान कार्यालयानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडूनही प्रस्तावाला गती; नागभीड–मार्कंडादेव रेल्वेमार्गासाठी दुहेरी सकारात्मक हालचालPMO ने रेल्वे बोर्डाकडे पाठविला प्रस्ताव; जिल्हाधिकारी कार्यालयानेही विभागीय आयुक्तांकडे केला वर्ग — केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांच्या पाठपुराव्याला यश

बाळगंगा नदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री मकरंद जाधव-पाटील

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा