vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

बालकांमधील न्यूमोनिया प्रतिबंध मोहीमेची नवी मुंबईत सुरूवात

बालकांमधील न्यूमोनिया प्रतिबंध मोहीमेची नवी मुंबईत सुरूवात

 

        आरोग्य प्रतिनिधी  बालकांमधील न्यूमोनियाचा प्रतिबंध, त्याचे लवकर निदान व वेळेवर उपचार याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत SAANS (Social Awareness and Action to Neutralize Pneumonia Successfully) मोहीमेचा नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

          सदर मोहीम दि. १२ नोव्हेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. बालकांमधील न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दर हजार जिवंत जन्मांमागे ३ पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेद्वारे निश्चित करण्यात आले आहे.

          या मोहिमेंतर्गत न्यूमोनियाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, आजाराचे वेळीच निदान आणि योग्य उपचार याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. विशेषतः पाच वर्षांखालील बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच ‘न्यूमोनिया नाही तर बालपण सही’ हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

          मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी देऊन अतिजोखमीच्या व आजारी बालकांचा शोध घेणे, खोकला व श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे असलेल्या बालकांची तपासणी करणे, गरजेनुसार त्यांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करणे, तसेच बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागांमध्ये संशयित न्यूमोनिया रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

          यासोबतच Pneumococcal Conjugate Vaccine (PCV) लसीकरणाबाबत जनजागृती, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि बालकांच्या आरोग्यविषयक नियमित पाठपुराव्यावर भर देण्यात येणार आहे.

          बालकांमधील न्यूमोनियाचे वेळेत निदान होऊन प्रत्येक बालकाला योग्य व वेळेवर उपचार मिळावेत या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत ही मोहीम सार्वजनिक रुग्णालये, माता बाल रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशा विविध ठिकाणी प्रभावीपणे राबविण्यात येणार असून सदर मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन

असंसर्गजन्य आजारांविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभावी मोहीम

बीड जिल्ह्यात १७७३ रुग्णांना सुमारे १३.६९ कोटीची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ गीतातून जनजागृतीचा संदेश; उदयनगर येथे CPHC प्रशिक्षण उत्साहात

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृती

आयोडिनयुक्त मीठाचा वापर करु या, गलगंड पासुन मुक्त होऊ या : डॉ. जयश्री भुसारेजागतिक आयोडिन न्युनता विकार नियंत्रण दिन – 21 ऑक्टोबर

vishwatmaklokswamivarta