vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मत्स्योदरी अध्यापक महाविद्यालयात सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात छात्राध्यापकांच्या कलाविष्कारांनी जिंकली उपस्थितांची मने; शिवस्तुतीपर पोतराज गीत ठरले विशेष आकर्षण..

मत्स्योदरी अध्यापक महाविद्यालयात सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात छात्राध्यापकांच्या कलाविष्कारांनी जिंकली उपस्थितांची मने; शिवस्तुतीपर पोतराज गीत ठरले विशेष आकर्षण..

जालना (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मत्स्योदरी अध्यापक महाविद्यालयात बी.एड. द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांनी आयोजित केलेले सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विविध प्रांतांच्या वेशभूषा, गीत, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांतून छात्राध्यापकांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडविले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वडजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मंगेश ढोबळे उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ. जयनारायण रेगुडे, प्रा. डॉ. कावेरी डहाळे, प्रा. गुजर आणि प्रा. जोशी यांची उपस्थिती होती. कवयित्री छात्राध्यापिका शीतल भोईटे यांनी प्रभावी शैलीत सूत्रसंचालन केले.

प्रा. डॉ. जयनारायण रेगुडे आणि छात्राध्यापिका श्रीदेवी सूर्यवंशी यांनी सादर केलेले शिवस्तुतीपर पोतराज गीत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. मंगेश ढोबळे यांनी सांस्कृतिक उपक्रमांमुळे भावी शिक्षकांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता व संघभावना विकसित होते, असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. वडजे यांनी छात्राध्यापकांच्या नियोजनाचे व कलागुणांचे कौतुक केले. कला, संस्कृती आणि मैत्रीचा संगम घडविणारे हे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.

 0000

संबंधित पोस्ट

पैठण तालुक्याचे विविध विकास कामाचा आढावा.सर्वसामान्यांच्या तक्रारी निवारणाबरोबरच विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

पाणी वापराच्या काटकसरीबाबत गावागावात जनजागृती करा – पालकमंत्री नरहरी झिरवाळ पाणी वापराबाबत पालकमंत्री यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश सन 2026-27 “

15 सप्टेंबर, 2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

vishwatmaklokswamivarta

मुंबईचे महापौर रितू तावडे यांना बॉम्बने उडवण्याची धमकीचा इमेल- पालिका मुख्यालयात सुरक्षेत मोठी वाढ …

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta