vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महात्मा फुले यांच्या 136 व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यकारिणी जाहीर

महात्मा फुले यांच्या 136 व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यकारिणी जाहीर

जालना / प्रतिनिधी-महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 136 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मॉ सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात, राजारामनगर, रेल्वे स्टेशन रोड येथे झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी राहुल रायकर, कार्याध्यक्षपदी गणेश हारकर, सचिवपदी अश्विन आंबेकर, सहसचिवपदी शामभाऊ पाउलबुद्धे,गोकुळ स्वामी तर उपाध्यक्षपदी दीपक वैद्य, राजू विठ्ठल इंगळे , कैलास काशिनाथराव रसाळ, जयप्रकाश जाधव, अशोक खांडेभराड, सुरेश खांडेभराड, नितीन इंगळे, नितीन तायडे, प्रा. सत्यंग मुंढे, बबनराव घायाळ, ज्ञानेश्वर धानुरे, शिवकुमार राऊत, अमोल धानुरे, अनिल वाघमारे, सुरेश रत्नपारखे यांची निवड करण्यात आली.

उपसचिवपदी वैजिनाथ नागरे यांच्यासह सदाशिव वाघमारे, संदीप जैवळ, लक्ष्मण इधाटे, अमरदीप शिंदे, संतोष जमधडे, गंगुबाई वानखेडे आणि मंगलताई खांडेभराड, बाबासाहेब बनसोडे , दशरथ तोंडुळे यांची निवड करण्यात आली. तसेच व्यवस्थापक म्हणून बाबासाहेब वानखेडे यांची निवड करण्यात आली. ओबीसी, दलित समाजासह सर्व समाजघटकांनी एकजुटीने राहून महात्मा फुले यांचे समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचे विचार पुढे न्यावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. महात्मा फुले यांची 136 वी पुण्यतिथी शनिवार, दि. 28 नोव्हेंबर 2026 रोजी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी 10.30 वाजता जालना शहर महानगरपालिकेसमोरील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, मा. आयुक्त अंजली शर्मा, उपाआयुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर , विद्युत अभियंता कोमल गावंडे, अभियंता राजेश बगळे, बांधकाम अभियंता सय्यद सऊद, लिपीक महेश मसारे, कैलास बुलबुले, प्रा. बुलबुले , दिनेश घेवंदे, कैलास चांदणे, निलेश शंकरपल्ली, अरूण वानखेडे, सर्व सभापती, मनपा नगरसेवक आदिंची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त फुले अनुयायी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी व आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांकडून राणीघाट अपघातातील जखमींची विचारपूस

वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ