vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून देशाची एकता अखंड ठेवली — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**काँग्रेसने संविधान दाखवून लोकांची दिशाभूल करू नये**रिपब्लिकन पक्षाच्या संविधान सन्मान रॅलीला दिल्लीतील जेन झी युवकांचा प्रचंड प्रचंड प्रतिसाद*

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून देशाची एकता अखंड ठेवली — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**काँग्रेसने संविधान दाखवून लोकांची दिशाभूल करू नये**रिपब्लिकन पक्षाच्या संविधान सन्मान रॅलीला दिल्लीतील जेन झी युवकांचा प्रचंड प्रचंड प्रतिसाद*

 

नवीदिल्ली प्रतिनिधी भारत देशात 6 हजार पेक्षा जास्त जाती ;अनेक धर्म ;18 भाषा विविध प्रांत असणाऱ्या भारत देशाला एकसंघ करणे अत्यंत अवघड होते.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून देशाला एकसंघ केले.भारताची एकता संविधानातून अखंड ठेवली.मात्र काही लोक संविधानाचे पुस्तक हातात घेऊन संविधानाच्या विरोधात काम करतात.काँग्रेसने संविधान दाखवून जनतेची दिशाभूल करू नये असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिला. नवी दिल्लीत तालकटोरा स्टेडियम येथे दिल्ली प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित संविधान सन्मान रॅलीत ना. रामदास आठवले बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय सिन्हा;दिल्ली प्रदेश अध्यक्ष फकारे आलम गुड्डू; कार्याध्यक्ष अनिल कुमार ; राजीव मेनन; रवी; कुंडली;मंजू छीब्बर लक्ष्मी;प्रतिमा तोतला; प्रेम लता दुबे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीत 26 अलीपुर रोड येथील निवासस्थानी रात्र रात्र जागून संविधान लिहिले. संविधानातून भारताची राष्ट्रीय एकात्मता लोकशाही स्वातंत्र्य मजबूत आहे.भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही मैदानात आहोत. कुणाच्या बापाचा बाप आला तरी कोणी संविधान बदलू शकत नाही असा इशारा ना. रामदास आठवले बोलत होते.

 काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत राहिली मात्र संविधानाने सांगितलेली समता प्रस्थापित करण्यात काँग्रेस अपयशी ठरली.गरिबी हटाव चा नारा दिला पण गरिबी हटली नाही.संविधान दाखवून जनतेची दिशाभूल करू नका.आंदोलनातून सरकार बदलता येत नाही.त्यासाठी आगामी 2029 च्या निवडणुकांच्या मैदानात उतरून प्रयत्न करा असे आवाहन ना.रामदास आठवलेंनी काँग्रेस ला दिले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गरिबांना 12 वर्षांत 4 कोटी पक्की घरे दिली आहेत. राहुल गांधी बात करते है बडी बडी लेकीन जनता है नरेंद्र मोदी के पीछे खडी अशी चारोळी ना. रामदास आठवले यांनी सादर केली. यावेळी दिल्लीतील जेन झी युवकांनी रिपब्लिकन पक्षाच्या संविधान रॅलीला प्रचंड प्रतिसाद दिला.हेमंत रणपिसे प्रसिद्धी प्रमुख

संबंधित पोस्ट

निराधार योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अव्वल !उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…

वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली,

विशेष लेख-उष्णतेच्या लाटेत अशी घ्या काळजी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साही स्वागत..

आताची मोठी बातमी -भाजप नेते आणि नंदीग्रामचे आमदार शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या,  कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश…

विधानपरिषदकामकाज….