vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी

मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

आयोगाने या परीक्षेसाठी जाहिरात क्रमांक ०१३/२०२६ अन्वये ३० एप्रिल २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तसेच २३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकान्वये उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

ही परीक्षा राज्यातील छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई आणि नागपूर या जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी परीक्षेच्या दिनांकाची नोंद घ्यावी, असे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार-राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

vishwatmaklokswamivarta

लातूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि  वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई

लातूर जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचयतींच्या सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज मागविणे सुरू

रॅगिंगविरोधी कायद्यासह विविध कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती