vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सशस्त्र दलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्वप्रशिक्षण; १२ डिसेंबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखती

सशस्त्र दलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्वप्रशिक्षण; १२ डिसेंबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखती

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील पात्र युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत सेवा भरती पूर्वप्रशिक्षण आयोजित करण्यात येते. हे प्रशिक्षण छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. १४ ते २३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांची दि. १२ डिसेंबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahanasik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील DSW Portal मधील Resources – PCTC Nashik – SSB 68 या पर्यायातून प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढावी. सर्व माहिती पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह ती मुलाखतीच्या वेळी सादर करावी.

प्रशिक्षणासाठी पात्रता :खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे.

१. सीडीएस किंवा एनडीए परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी पात्र असणे.२. एन्सीसी स्पेशल एन्ट्रीसाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असणे.३. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असणे.४. युनिव्हर्सिटी प्रवेश योजनेसाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असणे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असणे.वरील पात्रतेसंबंधीचे प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहताना सोबत आणणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी कार्यालयीन वेळेत ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्राबार कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहनबचत ही काळाची गरज असून वेतनातील 20 टक्के रक्कमेची गुंतवणूक करा

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिताअभ्यास गट गठीत करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

अग्निवीर भरतीसाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे१० ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजन; इच्छुक युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ