vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न..

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न..

नाशिक, प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या २१ फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वज स्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकविण्यात आला.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर हिमगौरी आडके-आहेर, अयोध्या न्यासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, महंत सुधीरदास पुजारी उपस्थित होते.

पंचधातूपासून तयार केलेल्या धर्मध्वजस्तंभावर ११ बाय ५ फूट आकाराचा भगवा ध्वज आहे. त्याच्यावर हनुमंतरायांची प्रतिमा तसेच सूर्यदेवतेचे ‘ॐ’ चिन्ह अंकित करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक अलंकरण करण्यात आले होते. सोहळ्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला औपचारिक धार्मिक प्रारंभ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली..

कार्यक्रमाला आमदार पंकज भुजबळ, आमदार सीमा हिरे, ‘फिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव), अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील (नाशिक), निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपमहापौर विलास शिंदे, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, शांताराम शास्त्री भानोसे, स्वामी अमृतानंद, वैष्णव व शैव आखाड्यांचे महंत, विश्वस्त शांताराम आवसारे, शुभम मंत्री, साधू-महंत आदी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

जालना यांच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान निबंध लेखन स्पर्धा – २०२६ आयोजित

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

ठाणे येथे 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन;नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा • जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांचा राज्यस्तरीय सन्मान 

गणपती पुळे येथील दुर्घटनेतील मयतांच्या वारसांचा मदत वाटप