vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत म्हाडाच्या अतिक्रमणविरोधी कारवाईवर भेदभावाचे आरोप; शिवसेना आणि भाजपच्या कार्यालयांवर JCB, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला दिलासा!

मुंबईत म्हाडाच्या अतिक्रमणविरोधी कारवाईवर भेदभावाचे आरोप; शिवसेना आणि भाजपच्या कार्यालयांवर JCB, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला दिलासा!

मुंबई प्रतिनिधी (अँटॉप हिल) : मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील सेक्टर-1 मधील सीजीएस कॉलनी येथील स्वप्नपुत्री को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या म्हाडा कॉम्प्लेक्सजवळील रस्ता आणि पदपथावरील कथित अनधिकृत बांधकामांवर आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली

या कारवाईदरम्यान म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी JCB च्या सहाय्याने विविध अनधिकृत बांधकामे हटवली. यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यालयांवरील बांधकामांचाही समावेश होता.मात्र, मुख्य इमारतीच्या शेजारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अरिफ यांच्या कार्यालयावर कारवाई करताना वेगळी भूमिका घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला. संबंधित कार्यालयाला न्यायालयाकडून स्थगिती आदेश (Stay Order) असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी स्थानिक काँग्रेसचे सरचिटणीस सुफियान वाणी यांनी म्हाडाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यालयांवरील बांधकामांवर JCB चालवण्यात आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अरिफ यांच्या कार्यालयावरील कथित १४ फूट उंचीचे अनधिकृत शेड अत्यंत काळजीपूर्वक स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

सामान्य नागरिकांच्या तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयांवरील बांधकामांवर कारवाई करताना वेगवेगळे निकष का लावले जात आहेत? भाजप आणि शिवसेनेच्या कार्यालयांवर थेट JCB चालवण्यात आले, मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला एवढी सवलत का देण्यात आली? असा सवाल सुफियान वाणी यांनी उपस्थित केला.

या कारवाईमुळे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून, कारवाईच्या पद्धतीबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अरिफ सय्यद यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की,

“माझे कार्यालय गेल्या ३० वर्षांपासून अस्तित्वात आहे. माझ्या कार्यालयासंदर्भात यापूर्वीच न्यायालयाचा स्थगिती आदेश (Stay Order) आहे. असे असतानाही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी स्थगिती आदेशाची दखल न घेता १२ फुटांवरील संपूर्ण बांधकाम तोडले.”न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही आपल्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप अरिफ सय्यद यांनी केला.या संपूर्ण प्रकरणात म्हाडाच्या कारवाईची पद्धत, न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची अंमलबजावणी आणि सर्व संबंधितांवर समान निकष लावण्यात आले होते का, याबाबत आता स्थानिक नागरिकांकडून स्पष्टीकरणाची मागणी होत आहे.

संबंधित पोस्ट

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

श्रीदेवी सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान-बी. दि. चेंज फाउंडेशन, शिर्डीच्या वतीने सन्मान; शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ संपन्न

नवी मुंबई महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरेनवीन मतदारांना नाव नोंदणीची संधी; दुरुस्ती व नाव वगळण्यासाठीही अर्ज करता येणार

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अजित पवारांचा मोठा वाटा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली अर्पण; सदस्यांनी आठवणींना दिला उजाळा