vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

            अमरावती, प्रतिनिधी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2025-26 साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. तथापि शैक्षणिक संस्थामधील सन 2025-26 मधील प्रवेश प्रक्रीया अद्याप पूर्ण झालेली नाही. यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रासह दि. 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in ताज्या घडामोडी या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज विहित नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण आणि विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

दुष्काळात शेतकऱ्यांची सक्तीने कर्जवसुली नको; खासगी सावकारांच्या छळाविरुद्ध कठोर कारवाई करा!-पालकमंत्री जयकुमार रावल पाणी, चारा, रोजगार आणि अन्नधान्यासाठी गावनिहाय नियोजन करा; दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यास सर्वोच्च प्राधान्य

vishwatmaklokswamivarta

अमृत दुर्गोत्सव २०२६’मध्ये दि.३० पर्यंत सहभागाची संधी

vishwatmaklokswamivarta

डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशनच्या वतीने हृदय शस्त्रक्रिया आणि कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या बालकांसह त्यांच्या पालकांसाठी माझ्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी #दिवाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा आश्वासनांचा अवमान थांबवा : अधिकाऱ्यांच्या मुजोरीवर आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक- लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान सहन केला जाणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार यांची परखड भूमिका

आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीसाठी अमरावती विभागातील २९२ उमेदवार पात्र कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार

vishwatmaklokswamivarta