वायुसेनेच्या जवानांसोबत दिवाळीचा आनंद!हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी दिवाळीच्या दिवशी सीमावर्ती भागातील हवाई दलाच्या तळाला भेट
राज्य प्रतिनिधी-हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी दिवाळीच्या दिवशी सीमावर्ती भागातील हवाई दलाच्या तळाला भेट देऊन आघाडीवर तैनात असलेल्या वायुयोद्धे आणि अग्निवीरवायू जवानांसोबत दिवाळी साजरी केली जवानांशी संवाद साधत आणि मिठाईची देवाणघेवाण करत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
कुटुंबापासून दूर राहूनही देशाच्या आकाशाच्या सुरक्षेसाठी समर्पित भावनेने कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या योगदानाचं त्यांनी कौतुक केलं.