vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

वाहतूक नियंत्रण शाखेसाठी क्रेन भाडेतत्वार घेण्याबाबत आवाहन

वाहतूक नियंत्रण शाखेसाठी क्रेन भाडेतत्वार घेण्याबाबत आवाहन

सातारा प्रतिनिधी

सातारा शहरामध्ये वाहतुक व्यवस्था सुरळीत व्हावी व वाहतुकीची कोंडी निर्माण होवु नये तसेच नागरीकांचे सुरक्षिततेस धोका पोहचू नये याकरीता वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर कसूरदार वाहन चालक यांचेवर मोटार वाहन कायद्यान्वये करण्यात येणारे कारवाई वेळी तसेच शहरात रहदारीस अडथळा निर्माण करणारी तसेच नो पार्किंग मध्ये लावलेली वाहने, अपघात वाहाने, बेवारस वाहने क्रेनच्या (टो-गाडी) सहाय्याने टोईंग करणेसाठी वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर येथे दोन क्रेन भाडेतत्वावर अटी व शर्ती करार ११ महिन्यांकरीता करून कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. अटी व शर्तीचे बाबतची माहिती नियंत्रण शाखा सातारा शहर कार्यालयात पाहणेस उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपली दरपत्रके/निविदा बंद लखोटयात दिनांक ५ डिसेंबर २०२६ रोजी पर्यंत वाहतुक नियंत्रण शाखा सातारा शहर रविवार पेठ, सातारा येथे सादर करावीत, असे आवाहन सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले आहे. दरपत्रके निवीदा सादर करतेवेळी क्रेनमालक स्वतःचे मालक क्रेन वाहतुक नियंत्रण शाखा सातारा शहर येथे समक्ष तपासणी करीता हजर करतील.

000

संबंधित पोस्ट

मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कृत्रिम वाळू युनिट स्थापन करणाऱ्यांसाठी संधी;6 मार्चला विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन

जालना येथे 27 मार्च रोजी  रोजगार मेळाव्याचे आयोजन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या- थेट कर्ज योजनेसाठी 30 मार्च रोजी लॉटरीने निवड

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगारमेळाव्यात 38 उमेदवारांना मिळाली संधी

लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत