vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

शासकीय कार्यालयांतील ‘व्हॉट्सॲप वेब’च्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा अनधिकृत प्रवेश, माहितीची चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका

शासकीय कार्यालयांतील ‘व्हॉट्सॲप वेब’च्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा,अनधिकृत प्रवेश, माहितीची चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका..

नवी दिल्ली, प्रतिनिधी : शासकीय कार्यालयांमध्ये संगणकावरून व्हॉट्सॲप वेबचा वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून वापरकर्त्यांच्या खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविण्याचा धोका भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने अधोरेखित केला आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्रावर सायबर गुन्हेगारांनी अनधिकृत ताबा मिळवल्यास संबंधित खात्यातील संदेश वाचणे, वापरकर्त्याच्या नावाने संदेश पाठविणे, संपर्क क्रमांक आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती मिळविणे शक्य होते. अशा प्रवेशाचा वापर करून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख धारण करणे, आर्थिक फसवणूक करणे, फिशिंगद्वारे माहिती मिळविणे तसेच अन्य सायबर गुन्हे घडविण्याचा धोका आहे.गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीसाठी व्हॉट्सॲप वेब टाळ

शासकीय कामकाजाशी संबंधित कागदपत्रे, प्रशासकीय माहिती, आर्थिक व्यवहारांचा तपशील, गोपनीय पत्रव्यवहार आणि अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सॲप वेबद्वारे करू नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. कार्यालयीन संगणकावर व्हॉट्सॲप वेबचे लॉगिन कायमस्वरूपी सुरू ठेवू नये. प्रत्येक वापरानंतर खात्यातून लॉगआऊट करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक संगणक, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अविश्वसनीय संगणकांवरून व्हॉट्सॲप वेब वापरणे टाळावे.संशयास्पद हालचालींकडे लक्ष देण्याचे निर्देश,व्हॉट्सॲप खात्यावरून आपल्या नकळत संदेश पाठविले जाणे, संपर्क व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्यात अन्य संशयास्पद हालचाली आढळणे, ही संभाव्य सायबर घुसखोरीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा बाबींकडे दुर्लक्ष न करता तातडीने आवश्यक खबरदारी घ्यावी. कार्यालयीन संगणकांची ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउझर आणि सुरक्षा प्रणाली नियमितपणे अद्ययावत ठेवावी. अनोळखी फाइल्स, संशयास्पद डाउनलोड, क्रॅक सॉफ्टवेअर तसेच अविश्वसनीय स्रोतांमधून प्राप्त झालेल्या फाइल्स उघडू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे.

शासकीय माहितीची गोपनीयता, कार्यालयीन पत्रव्यवहाराची सुरक्षितता आणि डिजिटल यंत्रणांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि डिजिटल संवाद साधताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता

भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धतीबाबत 22 एप्रिल रोजी विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

सूर्यकिरण एरोबॅटिक चमुने प्रथमच मेरठच्या आकाशात केले हवाई प्रात्यक्षिक दोन दिवसांच्या हवाई प्रात्यक्षिकाला एक लाखांहून अधिक नागरिकांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

गोवा विमानतळावर परीक्षा गैरव्यवहारासाठी वापरली जाणारी ब्लूटूथ साधने बाळगलेल्या दोन विमान प्रवाशांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने घेतले ताब्यात जप्त केलेल्या उपकरणांचा संबंध भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा भरती परीक्षेशी असल्याचेही झाले उघड, या प्रकरणी गुन्हाही दाखल

vishwatmaklokswamivarta

आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त ही काळाची गरज”— जिल्हाधिकारी किशन जावळे

संरक्षण भूमी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि AI चा वापर करण्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं आवाहन!

vishwatmaklokswamivarta