vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्रीनगरमध्ये रिपब्लिकन पक्षाचे भव्य जाहीर कार्यकर्ता संमेलन! केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांची उपस्थिती; काश्मीरमध्ये पक्षविस्ताराचा निर्धार!

 श्रीनगरमध्ये रिपब्लिकन पक्षाचे भव्य जाहीर कार्यकर्ता संमेलन! केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांची उपस्थिती; काश्मीरमध्ये पक्षविस्ताराचा निर्धार!

जम्मू कश्मीर प्रतिनिधी-श्रीनगर, जम्मू-काश्मीर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने श्रीनगर येथे जाहीर कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाला केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. रामदास आठवले साहेब यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेशेर-ए-काश्मीर पार्क येथे झालेल्या या जाहीर सभेत पक्षाची आंबेडकरी विचारधारा, सामाजिक न्याय, समता आणि सर्व समाजघटकांना समान संधी देण्याच्या भूमिकेवर भर देण्यात आला.

यावेळी रामदास आठवले साहेबांनी जम्मू-काश्मीरमध्ये रिपब्लिकन पक्षाचा संघटनात्मक विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन पक्षाचे कार्य पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले. जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या विस्तारात प्रदेशाध्यक्ष मंजूर खान यांचे योगदानही त्यांनी अधोरेखित केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश काश्मीरच्या भूमीत पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा संघटनात्मक प्रवास सुरू!

0000

संबंधित पोस्ट

पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करा – व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक ! वसई होली फॅमिली शाळेत येशू चमत्कारांचे नाट्य!-अंधश्रद्धा पसरवून धर्मांतर षड्यंत्र – जादूटोणा कायद्याने गुन्हा नोंदवा– हिंदु जनजागृती समितीची मागणी

२०२१चं अँटीलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द . 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी८ महिला व १ पुरुष क्रिकेटपटूची राज्यस्तरीय संधी; प्रशिक्षक ऋषिकेश काने यांच्या मार्गदर्शनाला यश