vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सैन्यदलातील अधिकारी पदासाठी इच्छुक युवकांना मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात 19 ते 28 ऑक्टोबरदरम्यान एसएसबी अभ्यासक्रम; जालना जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 15 ऑक्टोबरला मुलाखत

सैन्यदलातील अधिकारी पदासाठी इच्छुक युवकांना मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात 19 ते 28 ऑक्टोबरदरम्यान एसएसबी अभ्यासक्रम; जालना जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 15 ऑक्टोबरला मुलाखत

जालना, प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. सेवा निवड मंडळाच्या (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे 19 ते 28 ऑक्टोबर 2026 या कालावधीत एसएसबी अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांना मोफत प्रशिक्षणासह निवास व भोजनाची सुविधाही देण्यात येणार आहे.निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी केंद्रामध्ये पोहचण्यासाठी दि. 18 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावे.

जालना जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची निवड करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे 15 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी केले आहे.पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील DSW Portal मधील ‘Resources – PCTC Nashik – SSB 67’ या विभागातून प्रवेशपत्र डाउनलोड करावे. संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रवेशपत्राची प्रत मिळाल्यास तीही सोबत आणावी. प्रवेशपत्रासोबत नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून मुलाखतीच्या वेळी सादर करावीत.या प्रशिक्षणासाठी पुढीलपैकी संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.CDSE-UPSC किंवा NDA-UPSC परीक्षा उत्तीर्ण: कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA-UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार.

               एनसीसी स्पेशल एन्ट्री: एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर प्राप्त झालेले उमेदवार.

               टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स: एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असलेले उमेदवार.

               युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम: एसएसबी कॉल लेटर असलेले किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव

                असलेले उमेदवार.पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी संबंधित पात्रतेची प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथील प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ई-मेल : training.pctcnashik@gmail.com. दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306. भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून करिअर घडवू इच्छिणाऱ्या पात्र युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड मधील भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशीकार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना – सचिव रुचेश जयवंशी

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta

लिंबगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा #मुक्काम  ग्रामस्थांशी साधला थेट #संवाद

२१ जुलै रोजी जालना येथे संविधानिक हक्कांसाठी मोर्चा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांचे आवाहन

*उपहारगृह सुरू करण्यासाठी निवीदा सादर करण्यास मुदतवाढ*

vishwatmaklokswamivarta

शिवकालीन वारसा पर्यटनाला मिळणार नवी ओळख**किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीरजीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार* *प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*