vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हनुमान अंश’ चित्रपटासाठी डॉ. विशाल चतुर्वेदी यांना 57 व्या इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार नीम करोली बाबांच्या आध्यात्मिक जीवनप्रवासाचे चित्रण करणाऱ्या या चित्रपटाने साध्या-सोप्या कथनशैलीतून संस्कृती, श्रद्धा आणि संगीत यांचा सुरेख संगम साधल्याबद्दल मिळवली परीक्षकांची प्रशंसा

हनुमान अंश’ चित्रपटासाठी डॉ. विशाल चतुर्वेदी यांना 57 व्या इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार-नीम करोली बाबांच्या आध्यात्मिक जीवनप्रवासाचे चित्रण करणाऱ्या या चित्रपटाने साध्या-सोप्या कथनशैलीतून संस्कृती, श्रद्धा आणि संगीत यांचा सुरेख संगम साधल्याबद्दल मिळवली परीक्षकांची प्रशंसा…

 

गोवा, प्रतिनिधी-आशयप्रधान चित्रपट आणि प्रभावी कथाकथनाच्या सामर्थ्याचा गौरव करणाऱ्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) डॉ. विशाल चतुर्वेदी यांना त्यांच्या पहिल्याच ‘हनुमान अंश’ या चित्रपटासाठी भारतीय फीचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. 28 नोव्हेंबर 2026 रोजी गोव्यात झालेल्या महोत्सवाच्या समारोप समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि 5 लाख रुपये रोख असे आहे.

चित्रपट, जाहिराती आणि संगीत व्हिडिओ अशा विविध क्षेत्रांत 100 हून अधिक प्रकल्पांवर लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या चतुर्वेदी यांचा सर्जनशील अनुभव या चित्रपटात दिसून येतो. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जवळपास पाच वर्षे वैद्यकीय व्यवसाय केला. त्यानंतर चित्रपट निर्मितीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केले असून, चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबतही काम केले आहे. तसेच ‘फौजी 2’ या दूरचित्रवाणी मालिकेसाठी लेखन केले आहे. नीम करोली बाबांचे जीवन आणि शिकवण यांच्याविषयीच्या अभ्यासातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यातूनच 2020 मध्ये प्रकाशित झालेले ‘डिव्हाइन डिटूर : दॅट चेंज्ड माय लाइफ’ हे पुस्तक त्यांनी लिहिले.

चित्रपटातील साधेपणा आणि भावनिक कथनशैलीचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. पुरस्काराची घोषणा करताना परीक्षकांनी, “अर्थसंकल्प महत्त्वाचा नाही, आशय महत्त्वाचा आहे,” असे नमूद केले. संस्कृती, श्रद्धा आणि संगीत यांचा भावनिक नाते जोडणारा सुरेख संगम घडवून आणल्याबद्दल त्यांनी चतुर्वेदी यांचे अभिनंदन केले. विशेष दृश्य परिणाम (स्पेशल इफेक्ट्स) आणि तंत्रज्ञानाचे वर्चस्व असलेल्या आजच्या काळात चित्रपटाची साधी, सहज कथनशैली हा एक ताजेपणाचा अनुभव असल्याचेही परीक्षकांनी म्हटले. जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचीही त्यांनी दखल घेतली

परीक्षकांच्या प्रशस्तिपत्रात म्हटले आहे : “बजेट नव्हे तर, आशय महत्त्वाचा असतो. चित्रपटाचे हे मूलभूत तत्त्व आपल्या ‘हनुमान अंश’ या पहिल्याच चित्रपटात प्रभावीपणे मांडल्याबद्दल आम्ही डॉ. विशाल चतुर्वेदी यांचा गौरव करतो.””संस्कृती, श्रद्धा आणि संगीत या गोष्टी एका प्रबळ भावनिक बंधाने एकत्र आणून तुम्ही विलक्षण उपलब्धी साध्य केली आहे. स्पेशल इफेक्ट्सच्या आणि तंत्रज्ञानाच्या या युगात, तुमच्या कथाकथनातील साधेपणा अत्यंत स्तुत्य आहे; म्हणूनच जगभरातील चित्रपटगृहांमध्ये या कलाकृतीला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली आहे. ‘हनुमान अंश’ या पहिल्याच चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ (बेस्ट डेब्यू डिरेक्टर) पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. विशाल चतुर्वेदी यांचे अभिनंदन,” असेही या प्रशस्तिपत्रात नमूद केले आहे.

 

संबंधित पोस्ट

जलसंधारण व भूजल संवर्धनासाठी बेलवडे बुद्रुक येथे श्रमदान उपक्रमभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुढाकाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मंत्री डॉ. अशोक वुईके प्रलंबित प्रश्नांचा नियमानुसार विचार करून कार्यवाही करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण सेवा द्या; प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करा : डॉ. किरण जाधवशासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याचे आयुक्तांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या” — आत्मसमर्पित संगीता उर्फ ललिता यांचे नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

vishwatmaklokswamivarta