vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष बेस्ट बससेवा, अखंडित विद्युत पुरवठा व पथदिव्यांची व्यवस्था तातडीने करा!,धारावीतील बेस्टच्या ८७ हजार वीज ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करा; अदानीच्या प्रस्तावित वीज वितरण व्यवस्थेला धारावीकरांचा विरोध!

 ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष बेस्ट बससेवा, अखंडित विद्युत पुरवठा व पथदिव्यांची व्यवस्था तातडीने करा!,धारावीतील बेस्टच्या ८७ हजार वीज ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करा; अदानीच्या प्रस्तावित वीज वितरण व्यवस्थेला धारावीकरांचा विरोध!

मुंबई प्रतिनिधी-७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष बेस्ट बससेवा, अखंडित विद्युत पुरवठा व पथदिव्यांची व्यवस्था तातडीने करा!,धारावीतील बेस्टच्या ८७ हजार वीज ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करा; अदानीच्या प्रस्तावित वीज वितरण व्यवस्थेला धारावीकरांचा विरोध!

**बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव यांच्या दहा प्रमुख मागण्या; बेस्ट प्रशासन आणि अदानी समूहाच्या प्रत्येक निर्णयावर धारावीकरांचे बारकाईने लक्ष!** *सदर बैठकीत बेचा चेअरमन तृष्णा चंद्रकांत विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली*

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाच्या महाव्यवस्थापक मा. डॉ. श्रीमती सोनिया सेठी (आयएएस) यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत देशभरातून चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांच्या सोयीसाठी विशेष बससेवा, पर्यायी रिक्षा वाहनतळांपासून बस जोडणी, अखंडित विद्युत पुरवठा, पथदिवे आणि सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे सदस्य श्री. संजय रमेश भालेराव यांनी निवेदनाद्वारे केली.गतवर्षी ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट प्रशासनाने केलेल्या विशेष नियोजनाबद्दल आभार व्यक्त करतानाच, मागील तीन वर्षांपासून सातत्याने मांडण्यात येत असलेल्या तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी भालेराव यांनी केली.

### बेस्ट प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या :**१. सायन – सोमय्या गार्डन ते सेना भवन विशेष बससेवा :** पुणे, सोलापूरच्या दिशेकडून रिक्षांनी येणाऱ्या अनुयायांसाठी पर्यायी रिक्षा वाहनतळ निश्चित करून तेथून सेना भवन व राजाबडे चौकापर्यंत विशेष बससेवा सुरू करावी.**२. धारावी टी-जंक्शन, माहीम रेतीबंदर आणि बीकेसी येथून विशेष बससेवा :** पालघर, डहाणू व आसपासच्या परिसरातून येणाऱ्या अनुयायांसाठी पर्यायी रिक्षा वाहनतळ उपलब्ध करून तेथून सेना भवनपर्यंत येण्या-जाण्यासाठी अतिरिक्त बसफेऱ्या सुरू कराव्यात.**३. टी. एच. कटारिया मार्गावरील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत :** धारावी पुनर्विकासाच्या बांधकामामुळे काही विद्युत खांब कुंपणाच्या आत असून पदपथही बाधित झाले आहेत. बेस्ट, महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि संबंधित विकासकांनी संयुक्त पाहणी करून सुरक्षित पादचारी मार्ग व प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून द्यावी.**४. चैत्यभूमी – राजगृह – बी.डी.डी. चाळी स्मृतिस्थळ दर्शन बससेवा :** अनुयायांसाठी विशेष बससेवा सुरू करून शेअरिंग टॅक्सी व रिक्षाचालकांकडून होणाऱ्या अवाजवी भाडेवसुलीवर कठोर कारवाई करावी.**५. माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानक ते धारावी अतिरिक्त बससेवा :** माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानक, माटुंगा लेबर कॅम्प, धारावी, आमराज स्कूल, अशोक मिल कंपाउंड तसेच धारावी ते चैत्यभूमी या मार्गांवर १ ते ७ डिसेंबरदरम्यान अतिरिक्त बसफेऱ्या सुरू कराव्यात. तरंगता पूल परिसरातील अनधिकृत वाहनतळांवर कारवाई करावी.*६. माटुंगा लेबर कॅम्पमधील चारही पुतळ्यांना विशेष प्रकाशव्यवस्था :** डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चारही पुतळ्यांच्या परिसरातील विद्युत व्यवस्था दुरुस्त करून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा.**७. धारावी संविधान चौकात कायमस्वरूपी विद्युत खांब उभारावेत :** संविधान चौकात एलईडी पथदिवे व सुरक्षित विद्युत जोडणी उपलब्ध करून द्यावी.

*८. बुद्धविहार व आंबेडकर पुतळ्यांच्या परिसरात अखंडित वीजपुरवठा :** धारावी, माहीम, माटुंगा, सायन, दादर, शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात विशेष प्रकाशव्यवस्था करून ४ ते ६ डिसेंबरदरम्यान आपत्कालीन विद्युत दुरुस्ती पथके तैनात करावीत.**९. विशेष नियोजन व वैद्यकीय मदत केंद्रे :** प्रमुख बसथांब्यांवर मार्गदर्शक कर्मचारी, प्राथमिक उपचार सुविधा आणि रुग्णवाहिका समन्वय उपलब्ध करून द्यावा. विशेष बसमार्ग, वेळापत्रक आणि संपर्क अधिकाऱ्यांची माहिती ३० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करावी.

### १०. धारावीतील बेस्टच्या विद्युत विभागावर अदानी समूहाची नजर असल्याची गंभीर शंका; धारावीकरांचा प्रस्तावाला विरोध!धारावी परिसरात बेस्ट उपक्रमाचे सुमारे ८७ हजार वीज ग्राहक आहेत. अनेक वर्षांपासून बेस्ट प्रशासनाने धारावीमध्ये विद्युत उपकेंद्रे, रिसिव्हिंग स्टेशन्स आणि भूमिगत विद्युत केबलचे विस्तृत जाळे उभारले आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने धारावीतील वीज वितरणासाठी आपल्या परवान्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त आहे. धारावीतील बेस्टच्या वीज ग्राहकांची मोठी संख्या आणि विद्युत विभागाचे आर्थिक महत्त्व लक्षात घेता अदानी समूहाची बेस्टच्या विद्युत विभागाकडे नजर असल्याची गंभीर शंका संजय रमेश भालेराव यांनी व्यक्त केली.बेस्ट प्रशासनाने एसपीपीपी (SPPP) अंतर्गत या प्रस्तावाला विरोध दर्शविल्याची माहिती असून, प्रशासनाने आपली अधिकृत भूमिका आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगासमोर नोंदविलेल्या हरकती सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.**धारावीतील नागरिकांचाही अदानीच्या प्रस्तावित वीज वितरण व्यवस्थेला विरोध असून, बेस्ट प्रशासन आणि अदानी समूहाच्या प्रत्येक निर्णयावर धारावीकर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ही बाब संबंधित प्रशासनाने विशेषत्वाने लक्षात घ्यावी, अशी ठाम भूमिका संजय रमेश भालेराव यांनी मांडली.**धारावीतील घरगुती वीज ग्राहक, लघुउद्योजक, कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे. नागरिकांवर सक्तीने वीज वितरण कंपनी बदलण्याचा निर्णय लादू नये. वीजदरवाढीचा अतिरिक्त आर्थिक बोजा ग्राहकांवर पडू नये. तसेच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक नागरिकांच्या सूचना व हरकती जाणून घेण्यासाठी सार्वजनिक जनसंवाद आयोजित करावा, अशी मागणी करण्यात आली.

### धारावीकरांना अंधारात ठेवून धारावीचा विकास करू नका!धारावीचा विकास करताना सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत हक्क, आर्थिक हित आणि सार्वजनिक सुविधांचे संरक्षण झाले पाहिजे. बेस्टची विद्यमान विद्युत वितरण व्यवस्था सुरक्षित ठेवण्याबाबत प्रशासनाने लेखी स्पष्टता द्यावी.महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपूर्वी आवश्यक नियोजन आणि ६ डिसेंबरपूर्वी सर्व प्रलंबित विद्युत दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. तसेच निवेदनातील सर्व मागण्यांवर केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी आग्रही मागणी संजय रमेश भालेराव यांनी केली.

### आढावा बैठकीस उपस्थित मान्यवरया महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे सरचिटणीस श्री. नागसेन कांबळे, उपाध्यक्ष श्री. महेंद्र साळवे साहेब, सामाजिक कार्यकर्ते व समिती सदस्य श्री. संजय रमेश भालेराव, श्री. प्रतीक कांबळे, अध्यक्ष विश्वशांती सामाजिक संघटना, श्री. श्रीकांत भिसे, श्री. शिरीष चिखलकर, श्री. रोहन राजपकर, श्री. वैभव मसने, श्री. विशाल जोंजाळ, श्री. बाळासाहेब पडवळ, श्री. आफक शेख, इम्रान भाई, श्री. सुशांत रुके, श्री. प्रशांत मोरे आणि श्री. धर्मराज ब्रॉम्हाणे आदी मान्यवर उपस्थित

00000

संबंधित पोस्ट

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार

*पीककर्ज वितरणात सातारा जिल्हा राज्यात तिसरा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील* खरिप हंगामासाठी शंभर टक्के पीक कर्ज वितरण करा

जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद· राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञानसंवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. 

vishwatmaklokswamivarta

बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन  

संत रोहिदास वाडा ‘कल्याणचा राजा’ सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने भाविकांना गणेशदर्शनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta