vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत शासकीय वसतिगृह सुरू

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत शासकीय वसतिगृह सुरू

मुंबई, प्रतिनिधी : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने मुंबई शहर जिल्ह्यात शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. हे वसतिगृह मुंबईतील वाशी, नवी मुंबई येथील सेक्टर १९ ब, प्लॉट क्र. ९ पहिला मजला येथे सुरू करण्यात आले आहे

२०२६-२७ पासून या वसतिगृहासाठी विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेताना त्याच पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर योजनेंतर्गत जागा रिक्त राहिल्यास पात्र विद्यार्थ्यांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या बारावी परीक्षेतील अंतिम निकालाचे गुण विचारात घेण्यात येतील.

२०२६-२७ साठी वसतिगृहातील प्रवेशामध्ये जात प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार इतर मागासवर्गासाठी ५१ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ३३ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी ६ टक्के, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४ टक्के, अनाथ विद्यार्थ्यांसाठी २ टक्के आणि आर्थिक मागास प्रवर्गासाठी ४ टक्के आरक्षण राहणार आहे. वसतिगृह प्रवेशासंदर्भातील शासन निर्णयातील अटी व शर्ती तसेच वसतिगृहाबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई येथे संपर्क साधावा.

0000

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव; अमोल वानखडे यांना ‘हिंदुरत्न’, तर प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना ‘नवदुर्गा सन्मान’*

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय, कॅथलॅब सेवांचे तातडीने लोकार्पण करा-मंत्री प्रकाश आबिटकर

राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; पाच दिवसांत 40 लाखांहून अधिक विक्री

वाळवा तालुक्यात 46.2 मि.मी. पावसाची नोंद

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी १७ प्रभाग समित्यांपैकी ‘पी दक्षिण’, ‘के पश्चिम’, ‘के उत्तर आणि के दक्षिण’, ‘एच पूर्व व एच पश्चिम’, ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या ६ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची निवडणूक आज पार पडली. या सर्व सहा ठिकाणची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.