vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोरेगाव येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

कोरेगाव येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह कोरेगांव जि सातारा या मुलांच्या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतीगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्टया मागास घटक तसेच विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा.

 वसतीगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. याशिवाय मासिक निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी तसेच गणवेशासाठी आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते. शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता शासकीय वसतीगृहामधील प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत होणाऱ्या वसतीगृह प्रवेशाचे अर्ज हे https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येणार आहेत.

वसतीगृह प्रवेशाबाबत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास सर्व अडचणींचे निराकरण करुन विद्यार्थी प्रवेश निश्चित होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले जाईल. याकरिता थेट वसतीगृहामध्ये संपर्क साध्ण्याचे आवाहन वसतीगृह अधीक्षक आशिष शिंदे यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

सेवा संकल्प अभियानातून विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांना गती जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक-2026 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नमुंमपा पोषण पुनर्वसन केंद्रातून कुपोषित बालकांसाठी प्रभावी उपचार व पोषण पुनर्वसन सेवा

vishwatmaklokswamivarta

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याबद्दल वरिष्ठ क्षयरोग उपचार परिवेक्षक रवींद्र पाईकराव यांचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल होण्याचा व प्रवास टाळण्याचा जिल्हा आरोग्य यंत्रणेचा सल्ला

vishwatmaklokswamivarta